जिरापाणी । Jirapani Recipe in Marathi | How to make Jirapani
जिरापाणी (प्रकार १)
साहित्य-
- अर्धी वाटी चिंचेचा कोळ,
- एक इंच आले,
- चमचाभर जिरेपूड,
- चिमूट मिरेपुड,
- चिमूट लाल तिखट,
- एक टी स्पून लिंबाचा रस,
- २ चमचे साखर,
- चिमुट गरम मसाला,
- चवीप्रमाणे सेंदेलोण,
- पुदिन्याची ८/१० पाने
- बर्फाचा चुरा.
कृती-
- चिंचेचा कोळ गाळून घ्या,
- त्यात साखर घाला,
- आल्याचा कीस व पुदिन्याची पाने मिक्सरवर बारीक वाटा,
- थोडे पाणी घालून रस गाळा.
- तो कोळात घाला.
- मग इतर सर्व पदार्थ घालून हलवा.
- ग्लासमध्ये खाली बर्फाचा चुरा घाला.
- त्यावर मिश्रण घाला,
- हलवून घ्या.
टीप-
पंजाबमध्ये ते जिरापाणी जेवणापर्वी घेण्याची पद्धत आहे. यात आले, जिरे, पुदिना, सेंदेलोण हे पाचक पदार्थ असल्याने जेवण पचायला मदत होते.
जिरापाणी (प्रकार २)
साहित्य-
- पाव किलो चिंचेचा गाळलेला कोळ,
- प्रत्येकी चमचाभर बडीशेप,
- जिरे,
- मोहरी,
- दही,
- काळे मिरे,
- तीन सुक्या लाल मिरच्या,
- दोन टेबलस्पून अनार दाणा,
- चाट मसाला
- वेलची.
कृती-
- मसाल्याचे सर्व पदार्थ बारीक करून घ्यावेत.
- कोळात पाणी घालून तो एक लिटर करावा.
- त्यात मसालापूड घालावी व हलवावे.
- नंतर हे पाणी माठात ५/६ तास ओतून ठेवावे.
- प्यायला देताना थोडा बर्फ व पुदीन्याची जाडसर वाटलेली पाने घालून घ्यावे.
- हे पेय चवदार असुन थंड गुणधर्माचे आहे.
- त्यामुळे उन्हाळ्यासाठी उत्तम पेय आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.