शाही पनीर | Shahi Paneer Recipe in Marathi | How Make Shahi Paneer
साहित्य -
- एक पाव ताजा पनीर,
- एक छोटा कांदा,
- आले लसूण यांची पेस्ट,
- अर्धी वाटी दही,
- एक चमचा खसखस,
- दहा-बारा काजू,
- अर्धा चमचा मगज,
- अर्धी वाटी फ्रेश क्रीम
- दोन-तीन लवंगा,
- दालचिनीचा छोटा तुकडा,
- जायपत्री,
- पाच सात काळे मिरे,
- एक तेजपत्ता,
- एक छोटा तुकडा बातलफुल,
- तीन हिरव्या मिरच्या,
- अर्धा चमचा जिरे.
- चुटकीभर हिंग,
- बारीक चिरलेली कोथिंबीर,
- चवीनुसार मीठ.
कृती -
- पनीरचे चौकोनी आकारचे बेताचे तुकडे कापून घ्या.
- खसखस, काजू, मगज, लवंग, मिरे, जायपत्री, दालचिनी व बातलफल या सर्व गोष्टी एक तासभर त्या बुडतील इतक्याच पाण्यात भिजत घाला.
- भिजल्यावर मिक्सरमधून त्या चांगल्या बारीक वाटून घेऊन त्याचा गोळा तयार ठेवा.
- मिक्सर धुवून ते पाणी पण ठेवा,
- पॅनमध्ये अगदी बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची व आले लसूणची पेस्ट व जिरे, तेजपत्ता घाला.
- त्यावर पाव वाटी फ्रेश क्रीम अथवा घरातली दुधाची साय घाला.
- सर्व गोष्टी गुलाबी रंग येईपर्यंत परता.
- भाजी करण्यापूर्वी पनीरचे तुकडे थोडेसे मीठ, हळद व लाल तिखट, दह्यात घालून मॅरीनेट कर ठेवा.
- कांदा लाल झाल्यावर त्यावर वाटून ठेवलेला गोळा घाला.
- तो कडेने क्रीम सुटेपर्यंत मंदाग्नीवर परता हवे असल्यास काढून ठेवलेले पाणी थोडे थोडे घालून परता म्हणजे जळणार नाही.
- उरलेले सर्व पाणी घाला.
- पाणी उकळू लागले की मॅरीनेट करून ठेवलेले पनीरचे तुकडे घाला.
- अजून थोडे मीठ व कोथिंबीर घालून पाच सात मंद गॅसवर पनीर शिजू द्या.
- गॅस बंद करा.
- पॅनवरचे झाकण काढु नका व पॅन गॅसवरच राहू द्या.
- गॅसच्या गरमीने व वाफेने पनीर आणखी शिजून जास्त चविष्ट होते.
- वाढताना गरम करून उरलेले क्रीम घाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.