पनीर कोफ्ता | Paneer Cofta Recipe in Marathi | How to Make Paneer Cofta
साहित्य -
- पनीर,
- दोन चमचे कॉर्न फ्लोअर,
- चवीपुरते मीठ,
- तळण्यासाठी तेल,
कोफ्त्याच्या रस्स्यासाठी साहित्य
- एक छोटा कांदा,
- आले लसूण यांची पेस्ट,
- अर्धी वाटी दही,
- एक चमचा खसखस,
- दहा-बारा काजू,
- अर्धा चमचा मगज,
- अर्धी वाटी फ्रेश क्रीम
- दोन-तीन लवंगा,
- दालचिनीचा छोटा तुकडा,
- जायपत्री,
- पाच सात काळे मिरे,
- एक तेजपत्ता,
- एक छोटा तुकडा बातलफुल,
- तीन हिरव्या मिरच्या,
- अर्धा चमचा जिरे.
- चुटकीभर हिंग,
- बारीक चिरलेली कोथिंबीर,
कृती -
- पनीर स्वच्छ धुवून थोडावेळ चाळणीवर निथळत ठेवा.
- स्टीलच्या किसणीने किसून घ्या.
- त्यात चवीपुरते मीठ व कॉनफ्लावर मिसळून त्याचा घट्ट गोळा तयार करा.
- कढईत तेल घालून तापत ठेवा.
- पनीरच्या गोळ्याचे हातावर दाबून चपटे पण पोकळ असे काेफ्ते तयार करून मंदाग्नीवर तळून घ्या.
- खसखस, काजू, मगज, लवंग, मिरे, जायपत्री, दालचिनी व बातलफल या सर्व गोष्टी एक तासभर त्या बुडतील इतक्याच पाण्यात भिजत घाला.
- भिजल्यावर मिक्सरमधून त्या चांगल्या बारीक वाटून घेऊन त्याचा गोळा तयार ठेवा.
- मिक्सर धुवून ते पाणी पण ठेवा,
- पॅनमध्ये अगदी बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची व आले लसूणची पेस्ट व जिरे, तेजपत्ता घाला.
- त्यावर पाव वाटी फ्रेश क्रीम अथवा घरातली दुधाची साय घाला.
- सर्व गोष्टी गुलाबी रंग येईपर्यंत परता.
- कांदा लाल झाल्यावर त्यावर वाटून ठेवलेला गोळा घाला.
- तो कडेने क्रीम सुटेपर्यंत मंदाग्नीवर परता
- हवे असल्यास काढून ठेवलेले पाणी थोडे थोडे घालून परता म्हणजे जळणार नाही.
- उरलेले सर्व पाणी घाला.
- रस्सा उकळू द्या.
- जेवणापूर्वी रस्सा चांगला पुनः उकळवा
- व तो गरम असतानाच त्यात कोफ्ते घाला.
- क्रीम घाला व पाच मिनिटे झाकून ठेवून वाढा.
- कोफ्ते जास्त वेळ रस्स्यात राहिले व पुन्हा पुन्हा गरम केले तर ते मोडण्याची शक्यता असते.
टीप-
- जर पनीरचा मलई कोफ्ता करावयाचा असेल तर घरातल्या दुधाची ताजी साय तासभर फ्रीजरमध्ये झाकून ठेवा
- व पनीरचे कोफ्ते करतेवेळी त्या गोळ्याची हातावर थोडीशी खोलगट वाटी करून ती अगदी घट्ट अशी सायीचा थोडा गोळा त्या वाटीत घाला
- व वाटी सर्व बाजूने व्यवस्थित बंद करून मंदाग्नीवर तळा व वाढताना वरील प्रमाणेच वाढा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.