चिली पनीर | Chilli Paneer Recipe in Marathi| How to Make Chilli Paneer
चिली पनीर | Chilli Paneer Recipe | How to Make Chilli Paneer |
साहित्य-
- एक पाव ताजे पनीर,
- दोन सिमला मिरच्या.
- दोन हिरव्या मिरच्या,
- अर्धी वाटी टोमॅटो सॉस,
- दोन चमचे चिली सॉस,
- एक चमचा सोया सॉस,
- आवडीप्रमाणे थोडेसे व्हिनीगर,
- अर्धा चमचा काळी मिरी पावडर,
- मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर,
- चवीनुसार मीठ,
- दोन चमचे कॉर्नफ्लोअर,
- तेल,
- पाच सात पाकळ्या लसूण आवडत असल्यास,
- अगदी थोडा अजिनोमोटो.
कृती-
- पनीरचे सारख्या आकाराचे तुकडे करून घ्या.
- सिमला मिरचीचे चौकोनी तर हिरव्या मिरचीचे लांबट तुकडे करा.
- हिरवी मिरचीचे मधून उभे दोन भाग करा.
- लसूण सोलून तो दगडाच्या खलात किंवा पोळपाटावर रगडून बारीक करा.
- एका पॅनमध्ये प्रथम तेल घालून त्यावर लसूण घाला.
- तो गुलाबी रंगावर परता.
- त्यात दोन्ही मिरच्यांचे तुकडे, काळी मिरी पावडर व मीठ घाला.
- तुकड्यांचा थोडासा रंग बदलला की त्यात ओळीने तिन्ही सॉस घालून मंद आचेवर सॉस तेल सोडेपर्यंत परता,
- आता त्यात पनीरचे तुकडे घालून ते तुकडे मोडणार नाहीत अशा पद्धतीने दोन-चार मिनिटे परता.
- कॉर्नफ्लोअर गुठली न होता पाण्यात कालवा.
- ते पाणी व आणखी थोडे साधे पाणी पनीरवर घाला.
- पाच मिनिटे शिजू द्या.
- गॅस बंद करून कोथिंबीर व व्हिनिगर घालून कढईवर झाकण ठेवून भाजी मुरू द्या.
टीप -
- खाण्यापूर्वी चार-पाच तास ही भाजी करून ठेवावी म्हणजे पनीर त्या सॉसमध्ये व्यवस्थित मुरते व चविष्ट होते.
- खाताना गरम करून खावी.
- आवडत असल्यास कॉर्नफ्लोअर पातळ भिजवून त्यात पनीरचे तुकडे बुडवून तळून घ्यावेत व ते भाजीत टाकावेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.