थंडाई शरबत ।Thandai Sharbat in Marathi | How to make Thandai Recipe
साहित्य-
- ४ कप दूध,
- आठ मिरे,
- एक टेबल स्पून खसखस,
- चमचाभर बडीशेप, चार मगज
- अर्धा चमचा वेलची पूड,
- १० बदाम बी,
- चमचाभर रोझ इसेन्स
- चवीप्रमाणे साखर,
- गुलाब पाकळ्या सजावटीसाठी
कृती-
- खसखस, बदाम व चार मगज पाण्यात भिजत घालावेत,
- तीन चार तासांनी ते काढून या भिजलेल्या बदाम खसखस चार मगजमध्ये मिरी, बडीशेप घालून ते बारीक वाटावे,
- चार कप दुधात चार कप पाणी व साखर घालून ते ढवळावे
- व उकळायला ठेवावे.
- तयार वाटणात थोडे थंड दूध घालून ते सरसरीत करावे.
- गॅस मंद करून हे मिश्रण उकळत्या दुधात हलवत हळूहळू घालावे.
- ५/७ मिनिटे उकळल्यानंतर त्यात रोझ इसेन्स घालून खाली उतरावे.
- थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवावे.
- पिण्यास देताना ग्लासमध्ये थंडाई घालून वरून गुलाब पाकळ्या भुरभुराव्यात.
टीप-
अंगातील उष्णता कमी करणारी, थकवा भरून काढणारी म्हणून ही थंडाई पंजाबात उन्हाळ्यात पिण्याची पद्धत आहे. चार मगझ, लाल भोपळा, कलिंगड, खरबूज व काकडीच्या बिया एकत्र असतात. बाजारात याचे तयार पाकीट मिळते. घरीही आपण या बिया वाळवून ठेवू शकतो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.