Baked लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
Baked लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शिंगाड्याचा गोड केक रेसीपी मराठीत | Shinghada sweet Cake Recipe in Marathi
साहित्य-
- एक वाटी शिंगाड्याचे पीठ,
- पाऊणवाटी साखर
- अर्धा वाटी दही,
- अर्धा वाटी साजूक तूप,
- एक वाटी दूध,
- अर्धा वाटी ओले खोबरे,
- थोडा खाण्याचा सोडा,
- काजु,
- बदाम,
- बेदाणा,
- वेलची पूड.
कृती-
- दह्यामध्ये साखर, तूप, दूध व शिंगाड्याचे पीठ असे सर्व कालवून चार-पाच तास मुरू द्यावे.
- केक करावयाच्या वेळी त्यात अर्धा चमचा सोडा किंवा एक चमचा फ्रूटसॉल्ट घालून फेटावे.
- त्यात काजू बदामाचे काप व बेदाणा थोडा शिंगाड्याच्या पीठात घोळून टाकावा.
- वेलची पूड टाकावी
- ओव्हनमध्ये नेहमीच्या केकप्रमाणे केक करावा.
- ओव्हन नसल्यास एका जाड तव्यावर वाळू टाकून गॅसवर तवा ठेवावा
- व एका भांड्याला तूप लावून शिंगाड्याचे पीठ त्यात टाकावे
- व ते भांडे वाळू टाकलेल्या तव्यावर ठेवून वर पुन: जाड तवा व त्यावर वाळू ठेवून केक भाजावा
- किंवा कूकरमध्येही वाळू टाकून त्यावर केकचे भांडे ठेवून शिटी न लावता कुकर गॅसवर ठेवल्यासही केक भाजला जातो.
- केक तयार झाल्यावर काजू बदामचे काप लावावे
- व वड्या पाडाव्यात.
बिना अंड्याचा केक | Eggless Cake Recipe in Marathi
साहित्य-
- मैदा १ वाटी,
- तूप/डालडा अर्धी वाटी,
- पिठी साखर १ वाटी (आवडीप्रमाणे),
- बेकिंग पावडर- १ चिमूट,
- इसेंस (रंग, चवीकरिता),
- सजावटीकरिता चेरी,
- मेवा.
बिना अंड्याचा केक Eggless Cake Recipe |
कृती-
- सर्वप्रथम १५० ते १८० अंश से.वर ओव्हन सेट करून घ्यावा.
- मैदा व बेकिंग पावडर २ ते ३ वेळा एकत्र चाळून घ्यावे.
- एका मोठ्या परातीत तूप घेऊन हाताच्या तळव्यांनी फेटून घ्यावे.
- त्यात थोडी थोडी करून सर्व पिठीसाखर मिसळा.
- तूप व साखरेचे मिश्रण फेटून पांढरे शुभ्र व मऊ झाले पाहिजे.
- कोरड्या चमच्याने मिश्रणात थोडा थोडा मैदा घालून नीट मिसळा.
- मिसळताना एकाच दिशेने गोलाकार फिरवा म्हणजे गुठळ्या होणार नाही.
- मैदा मिसळून झाल्यावर झाल्यानंतर इसेन्स घाला
- व नंतर मिश्रण केकच्या (अॅल्युमिनियमच्या) भांड्यात ओता.
- तापलेल्या ओव्हनमध्ये केकचे भांडे ठेवून १५ ते २० मिनिटे बेक करा. (भाजून घ्या.)
- भाजून केक तयार झाल्याची खूण म्हणजे त्यामध्ये एका काठाने स्टीलची सुरी (चाकू) टाकला असता ती स्वच्छ बाहेर निघाली पाहिजे
- सुरीला मिश्रण चिकटता कामा नये.
- भाजलेल्या केकचे भांडे ओव्हनमधून बाहेर काढा.
- भांड्याच्या कडेने सुरी फिरवून केक भांड्यापासून सोडवा
- व प्लेटवर अलगद उपडा करा.
- केक साधारण थंड झाल्यावर आयसिंग करा.
डबलडेकर केक । Double Decker Chocolate Cake Recipe in Marathi
साहित्य-
कृती-
डबल केक असल्यामुळे दुसऱ्या केकची कृती खाली देत आहे.
साहित्य-
कृती-
- ११५ ग्रॅम मैदा,
- ११० ग्रॅम साखर,
- ७५ ग्रॅम लोणी,
- दीड चमचा बेकिंग पावडर,
- १ चमचा व्हॅनिला इसेंस.
- अर्धा कॅन मिल्कमेड (कंडेन्स मिल्क),
- २ वाट्या अँपल व पायनॅपल किसलेले.
डबलडेकर केक । Double Decker Chocolate Cake Recipe |
कृती-
- प्रथम मैदा व बेकिंग पावडर एकत्र करून दोन तीनदा चाळून घ्या.
- नंतर एका भांड्यात लोणी घेऊन ते चांगले फेसून घ्या.
- नंतर त्यात पिठीसाखर थोडी-थोडी घालून फेटा.
- एकाच वेळेस पूर्ण घालू नका.
- नंतर त्यात मिल्कमेड घाला व फेटा.
- इसेंस घाला.
- हे सर्व एकाच दिशेने फेटत राहा.
- सरते शेवटी मैदा व बेकिंग पावडर घाला.
- चांगले फेटा.
- त्यात किसलेले पायनॅपल व अँपल घालून एकदा परत फेटा
- व हे मिश्रण लोणी लावलेल्या केक पात्रात ओता.
- हे पात्र ओव्हनमध्ये ठेवून ४०० फॅ.वर १५ ते २० मिनिटे भाजा.
डबल केक असल्यामुळे दुसऱ्या केकची कृती खाली देत आहे.
साहित्य-
- १०० ग्रॅम चॉकलेट,
- १ कप लोणी,
- सव्वा कप मैदा,
- १ कप साखर,
- दीड चमचा बेकिंग पावडर,
- २ ते ३ चमचा दूध,
- इसेंस.
कृती-
- प्रथम चॉकलेटचा ग्रेड करा
- व त्यात लोणी घाला
- व ओव्हनमध्ये १ मिनिट हे मेल्ट करून घ्या.
- नंतर ओव्हनमधून भांडे बाहेर काढल्यावर ते फेटून घ्या.
- त्यात पिठी साखर व इसेंस घाला.
- तेही व्यवस्थित फेटा.
- एका परातीत मैदा व बेकिंग पावडर व्यवस्थित चाळून ठेवा.
- नंतर वरील फेटलेल्या मिश्रणात मैदा व बेकिंग पावडर घाला
- व एकाच दिशेने हे मिश्रण फेटत राहा.
- त्यात दूध घाला.
- बदाम, काजू, अक्रोड घाला.
- व्यवस्थित फेटल्यावर केकपात्रात लोणी लावून त्यावर हे मिश्रण घाला
- व ओव्हनमध्ये ठेवा.
- १८० डिग्री सेल्सियसवर २५ मिनिटे ठेवा.
- थंड झाल्यावर बाहेर काढा.
- नंतर या अगोदर तयार केलेला पायनॅपल केक घ्या.
- त्यावरील वरचा भाग थोडा सुरीने कापून घ्या
- व त्यावर साखरेचे पाणी पसरवा.
- मग त्यावर फ्रेश क्रीम पसरवा
- व त्यावर दुसरा तयार केलेला चॉकलेट केक घट्ट बसवा
- व मध्य भागातून पुन्हा साखरेचे पाणी लावा.
- मग या केकवर हवे तसे आयसिंग करा
- व बच्चे मंडळींना खायला द्या.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)