Halaman

    Social Items

Pickles लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Pickles लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

भाज्यांचे लोणचे । Mixed Vegetable Pickle Recipe in Marathi | How to make Vegetable Pickle | Achar १


भाज्यांचे लोणचे (उत्तर हिंदुस्थानी पध्दत) | Vegetable pickles (North Indian recipe)


साहित्य-


  • एक मध्यम आकाराचा फूल कोबीचा गड्डा.
  • चार गाजरे,
  • एक मूळा,
  • चार-पाच शलगम,
  • दहा-बारा हिरव्या मिरच्या
  • आल्याचा मोठा तुकडा,
  • एक लसणाची गड्डी,
  • सात आठ लवंगा,
  • अर्धा चमचा मिरे,
  • दोन तुकडे दालचिनी,
  • एक चमचा कलोंजी,
  • पाच-सात छोटी विलायची.
  • अर्धा चमचा जायपत्री,
  • चवीपुरते मीठ,
  • दोन चमचे तिखट,
  • दोन मोठे कांदे,
  • गुळाचा बेताचा खडा,
  • एक कप व्हिनिगर
  • दोन वाट्या मोहरीचे तेल,
  • हिंग
  • हळद.


भाज्यांचे लोणचे । Mixed Vegetable Pickle Recipe  How to make Vegetable Pickle  Achar
भाज्यांचे लोणचे । Mixed Vegetable Pickle Recipe  How to make Vegetable Pickle  Achar


कृती-



  • सर्व भाज्या स्वच्छ धुवून व पुसून त्याचे अलग अलग आकाराचे तुकडे करावेत.
  • थोडे आले व मिरच्यांचेही तुकडे करावेत.
  • एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवावे.
  • पान्याला उकळी येऊ द्यावी .
  • उकळी आल्यावर नंतर त्यात सर्व भाज्यांचे तुकडे घालावे.
  • व पाच मिनिटे झाकन ठेवावे.
  • तुकडे काढून घेऊन चाळणीवर निथळत ठेवावेत.
  • पांढऱ्या कपड्यावर सर्व भाज्यांचे तुकडे वरही पांढ-या कपड्याचेच पांघरून घालून
  • उन्हात दोनतीन तास वाळावोत.
  • कांदा, लसून व उरलेल्या हिरव्या मिरच्या आणि आले याची मिक्सर मधुन बारीक पेस्ट करावी.
  • लवंग, दालचिनी, वेलची, जायपत्री यांची पावडर करावी.
  • व्हिनिगरमध्ये गुळ घालून ठेवावा.
  • एक मोठ्या भांड्यात तेल टाकून कांद्याची पेस्ट गुलाबी रंग होईपर्यंत परतुन घ्यावी.
  • त्यामध्ये लाल तिखट, मीठ, गरम मसाला (वरीलप्रमाणे बनविलेला) व व्हिनिगर घालावा.
  • सर्व गोष्टी अगदी एक जीव होईपर्यंत परताव्या.
  • थोड्या थोड्या भाज्या घेऊन त्यात घालाव्या व परताव्या
  • अशा रितीने सर्व भाज्या त्या मसाल्यात मिसळून घ्याव्यात व गॅस बंद करावा.
  • उरलेले नेल धूर निघेपर्यंत गरम करावे.
  • पूर्ण थंड होऊ द्यावे
  • लोणचे बरणीत भरल्यानंतर ते तेल त्यावर वरून ओतावे.
  • शक्य तोवर भाज्य बुडेपर्यंत तेल घातल्यास लोणचे खराब होत नाही.

भाज्यांचे लोणचे । Mixed Vegetable Pickle Recipe in Marathi | How to make Vegetable Pickle | Achar

टोमॅटोचे लोणचे । Tomato Pickle Recipe in Marathi | How to make Tomato Pickle


साहित्य-


  • एक किलो लाल भडक पिकलेले देशी टोमॅटो,
  • आठ दहा हिरव्या मिरच्या.
  • एक लसणाची गड्डी,
  • आल्याचा मोठा तुकडा.
  • एक वाटीसाखर,
  • दोन चमचे तिखट,
  • चवीपुरते मीठ,
  • अर्धा कप व्हिनिगर
  • किंवा थोडे सॅट्रिक एसिड,
  • एक मोठी वाटी तेल,
  • मोहरीची डाळ अर्धी वाटी मोहरी,
  • हळद,
  • हिंग.


टोमॅटोचे लोणचे । Tomato Pickle Recipe  How to make Tomato Pickle
टोमॅटोचे लोणचे । Tomato Pickle Recipe  How to make Tomato Pickle


कृती-


  • प्रथम टोमॅटो धुवून बारीक चिरुन घ्या.
  • हिरवी मिरणी, आले व लसून यांचे तुकडे करून घ्या.
  • अर्धा तुकड्याची पेस्ट बनवा
  • व अर्धे तसेच राह द्या.
  • एका जाड बुडाच्या पातेल्यात तेलात मोहरी हळद व हिंग घालून त्याची फोडणी तयार करा.
  • त्यावर आले लसून व मिरची यांची पेस्ट घालून एक मिनिटे परता त्यावर टोमॅटोच्या फोडी घाला.
  • पाच सात मिनिटांनी टोमॅटो शिजू लागला की मिरची आले व लसून यांचे तुकडे, मीठ, तिखट व मोहरीची पूड घाला,
  • मिरच्यांचा रंग बदलेपर्यंत टोमॅटो शिजू द्या.
  • सारखे ढवळत राहा.
  • लोणचे खाली लागता कामा नये.
  • टोमॅटो पूर्ण शिजून टोमॅटोचेच पाणी आटत आले की साखर घाला.
  • पुन: थोडा वेळ शिजवा.
  • पूर्ण थंड झाल्यावर त्यात व्हिनीगर किंवा सॅट्रिक एसिड घाला.
  • हे लोणचे चांगले शिजवल्यास दोन महिने टिकते.
  • पिझा, सँडविच वगैरे बरोबर सुध्दा खाऊ शकतो.

टोमॅटोचे लोणचे । Tomato Pickle Recipe in Marathi | How to make Tomato Pickle

मोठ्या मिरच्यांचे झणझणीत लोणचे । Green Chilli Pickle Recipe in Marathi | Hiravya Mirchiche Lonche



साहित्य-

  • हिरव्या अथवा लाल रंगाच्या मोठ्या जाड्या.
  • मिरच्या एक पाव,
  • चार चमचे अमचूर पावडर,
  • सहा चमचे धणे-जिरे पावडर,
  • चवीपुरते मीठ,
  • एक चमचा मेथी दाणा
  • अर्धा चमचा हिंग पावडर,
  • दोन चमचे मोहरीची एकदम बारीक डाळ
  • मोठी वाटी मोहरीचे तेल
  • अर्धा चमचा हळद


मोठ्या मिरच्यांचे झणझणीत लोणचे । Green Chilli Pickle Recipe | Hiravya Mirchiche Lonche
मोठ्या मिरच्यांचे झणझणीत लोणचे । Green Chilli Pickle Recipe | Hiravya Mirchiche Lonche


कृती-


  • मिरच्या धुवून पुसून घ्या.
  • वरचा देठ अशा प्रकारे काढावयाचा की आतील सर्व बी हळूहळू मिरची न तुटता कोरुन बाहेर काढता येईल.
  • एका कढईत एक चमचा तेल घालून मेथी दाणा तळून घ्या
  • त्याची पावडर करा
  • आता तेल सोडून बाकीचा सर्व मसाला व मिरचीच्या बिया एकत्र करा
  • तो मसाला मिरच्यांमध्ये वरच्या बाजूने (जेथून देठ काढून टाकला आहे तिथून) दाबून दाबून भरा.
  • सर्व मिरच्या एका बरणीत ठेवा.
  • तेलाचा धूर निघेपर्यंत मोहरीचे तेल गरम करा.
  • पूर्ण थंड होऊ द्या.
  • ते तेल बरणीत सर्व मिरच्या बुडेपर्यंत ओता.
  • पाच-सहा दिवसात लोणचे तयार होईल.

मोठ्या मिरच्यांचे झणझणीत लोणचे । Green Chilli Pickle Recipe in Marathi | Hiravya Mirchiche Lonche