मोठ्या मिरच्यांचे झणझणीत लोणचे । Green Chilli Pickle Recipe in Marathi | Hiravya Mirchiche Lonche
साहित्य-
- हिरव्या अथवा लाल रंगाच्या मोठ्या जाड्या.
- मिरच्या एक पाव,
- चार चमचे अमचूर पावडर,
- सहा चमचे धणे-जिरे पावडर,
- चवीपुरते मीठ,
- एक चमचा मेथी दाणा
- अर्धा चमचा हिंग पावडर,
- दोन चमचे मोहरीची एकदम बारीक डाळ
- मोठी वाटी मोहरीचे तेल
- अर्धा चमचा हळद
कृती-
- मिरच्या धुवून पुसून घ्या.
- वरचा देठ अशा प्रकारे काढावयाचा की आतील सर्व बी हळूहळू मिरची न तुटता कोरुन बाहेर काढता येईल.
- एका कढईत एक चमचा तेल घालून मेथी दाणा तळून घ्या
- त्याची पावडर करा
- आता तेल सोडून बाकीचा सर्व मसाला व मिरचीच्या बिया एकत्र करा
- तो मसाला मिरच्यांमध्ये वरच्या बाजूने (जेथून देठ काढून टाकला आहे तिथून) दाबून दाबून भरा.
- सर्व मिरच्या एका बरणीत ठेवा.
- तेलाचा धूर निघेपर्यंत मोहरीचे तेल गरम करा.
- पूर्ण थंड होऊ द्या.
- ते तेल बरणीत सर्व मिरच्या बुडेपर्यंत ओता.
- पाच-सहा दिवसात लोणचे तयार होईल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.