व्हेज पांढरा रस्सा रेसीपी मराठी | कोल्हापुरी पांढरा रस्सा शाकाहारी /पांढरा रस्सा | पांढरा रस्सा | व्हेज पांढरा रस्सा | लय भारी पांढरा रस्सा | veg pandhara rassa | pandhara rassa recipe marathi | Kolhapuri pandhara rassa | How to make Veg Kolhapuri Pandhra Rassa | healthy Soup | Pandhra Rassa | Kolhapuri Style Curry | How to make Kolhapuri Pandhra Rassa
साहित्य -
- प्रत्येकी १ वाटी चिरलेला कोबी,
- चिरलेला बटाटा,
- चिरलेला फ्लॉवर,
- फरस बी,
- वाटाणा,
- दोन वाट्या नारळाचं दुध,
- दोन टे. स्पू. भिजवलेले मगज बी,
- २ टे. स्पू. भिजवलेले बदाम,
- दोन टे. स्पू. तीळ,
- २ टे. स्पू. खसखस,
- ८-१० लसूण पाकळ्या,
- २ इंच आल्याचा तुकडा,
- हिंग,
- मीठ,
- फोडणीसाठी लवंग,
- वेलची,
- दालचिनी
- मिरे,
- हिरव्या मिरच्या,
- तूप आणि
- अर्धी वाटी क्रीम.
कृती -
- कढईत थोडं तूप घेऊन ते तापल्यावर हिंग टाकावा.
- सर्व भाज्या मीठ घालून गरजेनुसार पाणी घालून शिजवाव्या.
- भिजलेले बदाम सोलून घ्यावेत
- मगज, बदाम, तीळ, खसखस, आलं-लसूण यांची थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये वाटुन पेस्ट करावी.
- शिजलेल्या भाज्यांमध्ये नारळाचं दूध आणि तयार केलेली पेस्ट घालून मिश्रण उकळत ठेवावं.
- वरून पळीनं तुपाची फोडणी करून घालावी.
- या फोडणीत लवंग, दालचिनी, मिरे, वेलची व हिरव्या मिरच्या घालाव्या.
- रस्सा चांगला ढवळून गरमागरम खाण्यास द्यावा.
- रस्सा वाढतांना बाऊलमध्ये भाजीवर क्रीम टाकून वाढावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.