दुधी मुठिया करी रेसीपी मराठी | लौकी मुठीया | Lauki Muthia recipe in Marathi | Doodhi Muthia Curry Recipe | Doodhi Muthia
साहित्य -
- ५०० ग्रॅम दुधी भोपळा,
- एक मोठी वाटी डाळीचं पीठ,
- १ कांदा,
- ३-४ हिरव्या मिरच्या,
- १ इंच आल्याचा तुकडा,
- कोथिंबीर,
- २ टे. स्पू. दही,
- धनेपूड,
- लाल तिखट,
- मीठ,
- हिंग,
- हळद,
- जिरे,
- गरम मसाला,
- १ टे. स्पू. लिंबाचा रस आणि
- कोथिंबीर
कृती -
- भोपळा सोलून किसून घ्यावा.
- त्यात डाळीचं पीठ, मीठ, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, धनेपूड, हळद आणि लिंबाचा रस घालून मिश्रण तयार करावं.
- लहान थाळीला तेलाचा हात फिरवून त्यात हे मिश्रण थापावं.
- मोदकपात्रात किंवा कुकरमध्ये थाळी ठेवून १५-२० मिनिटं ते वाफवून घ्यावं.
- मिश्रण गार झाल्यावर त्याचे चौकोनी काप करून गरम तेलात तळून घ्यावे.
- करीसाठी एका पातेल्यात तेलावर हिंग, जिरे, हळद घालून फोडणी करावी.
- त्यावर बारीक चिरलेला कांदा घालून परतावा.
- कांदा बदामी रंगावर आल्यावर त्यात तिखट, मीठ, धनेपूड घालून पुन्हा थोडं परतावं.
- नंतर त्यात पाणी घालावं,
- करीला दोन मिनिटं उकळल्यावर त्यात तळलेले चौकोनी तुकडे घालावे.
- कोफ्ता करी उकळल्यावर त्यात घुसळलेलं दही, गरम मसाला आणि कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.