Halaman

    Social Items

कोचईच्या वड्या रेसीपी मराठी | कुरकुरीत अळू वडी | अळू वडी कमीतकमी साहित्यात कुरकुरीत ,परफेक्ट रेसिपी | कोचई ची वडी/अळू वडी | आळू ची वडी रेसिपी | चमकदार वडी | Aalo chi wadi recipe in Marathi | Dhopyache panachi vadi | Kochai ke pan ki vadi | Step by Step Alu Vadi | Alu/Aalu Vadi Without Streaming | Patra Recipe | Gudi Padwa Recipes | Authentic Maharashtrian Snack | elephant ear leaf cooking | Chamakura vadi

झाडीत पावसाचे प्रमाण जास्त त्यामुळे इथे अळुची पानं भरपूर. या अळूला धोपा, चमकुरा, कोचई अशी विविध नावं आहेत. या कोचईच्या वड्या हे इथलं खास वैशिष्ट्य.

साहित्य -

  • कोचईची पानं,
  • तांदळाचं पीठ,
  • बेसन,
  • तिखट,
  • मीठ,
  • हळद,
  • चिंच किंवा काही आंबट पदार्थ,
  • दही,
  • लिंबू इ.
  • कारण कोचईच्या पानात खाज असते त्यासाठी आंबट घालणं आवश्यक असतं.

कृती -

  • एका मोठ्या परातीत किंवा ताटात कोचईची पानं उपडी ठेवावीत.
  • नंतर एका पातेल्यात तांदळाचं पीठ, बेसन, तिखट, मीठ, हळद, चिंच हे जिन्नस घातलेलं मिश्रण चांगलं एकजीव करावं.
  • हे मिश्रण घट्टसर असलं पाहिजे.
  • ते पातळ असता कामा नये.
  • संपूर्ण पानाला हे मिश्रण भरपूर लावावं
  • नंतर एका बाजूनं ते पानं उभं दुमडावं.
  • त्यावर मिश्रण लावून दुसरीही बाजू उभी दुमडावी.
  • त्यानंतर पुन्हा थोडं मिश्रण लावून पान खालून गादी गुंडाळीत न्यावी
  • तसं घट्ट गुंडाळीत न्यावं.
  • गोल, लांबट, गुंडाळी तयार करावी.
  • अशा साधारणतः विसेक पानांच्या गुंडाळ्या कराव्या.
  • पाने लहान असली तर एकावर एक ठेवली तरी चालतात.
  • नंतर एका मोठ्या जाड बुडाच्या पातेल्यात अर्धं पातेलं पाणी घेऊन त्यावर स्टीलची किंवा अॅल्युमिनियमची चाळणी ठेवावी
  • त्यावर सगळ्या पानांच्या 'गुंडाळ्या' ठेवाव्यात आणि
  • मोठं ताट झाकावं जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही.
  • गॅस मोठा ठेवावा
  • साधारणत: तास वाफवल्यावर विशिष्ट सुगंध दरवळायला लागतो.
  • उदबत्तीच्या काडीनं एखादी वडी टोचून बघावी काडी सहज टोचली गेली आणि वाफवलेल्या गुंडाळ्यांना काळसर रंग आला की, वडी पूर्ण वाफवली गेली असं समजावं.
  • सगळ्या वड्या मोठ्या ताटात थंड करायला ठेवाव्यात.
  • वड्या चांगल्या थंड झाल्यावर चाकूनं गोल काप करावेत आणि
  • कडक तेलात तळून कुरकुरीत करून घ्यावेत.
  • नुसते वाफवलेले कापही आवडीनं खाल्ले जातात.
  • वड्याच्या गुंडाळ्या वाफवून थंड झाल्यावर फ्रिजमध्येही ठेवता येतात.
  • ऐनवेळी पाहुणे आल्यास पोहे, उपमा, भजी करण्याऐवजी 'वड्याचे काप' तळून देता येतात. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.