Halaman

    Social Items

अक्षा रेसीपी मराठी | चिले | श्रावणदोसा | लसूण पाल्याचे आयते | सुपर टेस्टी आणि जाळीदार लसणाच्या पातीचे आयते | हरे लसण का चिला | लसूण पातीचे आयते | लहसुन के पत्तों के चीले विधि | हृदय के लिए लाभदायक लहसुन के पत्ते के चीले | Lasnache aayte recipe in Marathi | Lasnache Aayate | Green Garlic ( lahsun) ke patte chile | ayate | lahsun ke chile | how to make lahsun chile | HARA LAHSUN Ke CHILLE | Green Garlic Dosa | lahsun ke patte ke chile | hare lahsun ke chile | lahsun recipe | Green Dosa | Powari dish | Green spring Dosa | Green garlic cheela recipe

झाडीपट्टीमध्ये खेड्यांमध्ये घरोघरी 'वाडी' असते. आपण त्याला 'परसबाग' म्हणू या. अद्रकाचे वाफे, कोचईचे वाफे, सांबाराचा मिरचीचा, वांग्याचा वाफा असतो. वाल, कारल्याचे वेल असतात. भेंडी, बरबटी, दुधी, काकडी यांचीही रेलचेल असते आणि बोराच्या आकाराची 'भेदरं' म्हणन ओळखली जाणारी टोमॅटोही असतात. याच्या जोडीला लसणाच वाफा 'बारमासी' असतो. एक छोटा चौकोन साधारणतः चार बाय चार एवढ्या आकारात. त्यात लसणाच्या कळ्या लावल्या की त्यांना हिरवी पात/पानं येतात जणू तेवढ्या भागावर हिरवा गालिचाच अंथरल्यासारखा वाटतो. या लसणीच्या पानांपासून अक्षा किंवा चिले हा अतिशय वेगळा आणि चविष्ट पदार्थ बनतो.

साहित्य-

  • दोन हातात मावतील इतकी हिरवी लसणाची बारीक चिरलेली पानं,
  • शेरभर भिजलेले तांदूळ,
  • हिरवी मिरची कोशिंबीर
  • शेरभर तांदळाचे पीठ.
  • २ वाट्या कणीक ,
  • तिखट,
  • मीठ आणि
  • तेल.

कृती-

  • प्रथम बारीक चिरलेली लसणाची हिरवी पात भिजवलेले तांदुळ पाट्यावर/मिक्सरवर बारीक वाटून घ्यावे.
  • वाटताना त्यात हिरवी मिरची व कोथिंबीरही वाटावी.
  • नंतर त्या वाटणात तांदळाचं पीठ, कणीक, तिखट, मीठ घालावं.
  • नंतर सगळं मिश्रण हातानं हळहळू कालवावं.
  • कालवताना पिठाच्या गुठळ्या होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • कालवलेल्या मिश्रणात तिखट, मीठ आपल्या चवीनुसार घालावं
  • कारण मुळातच लसणाची पानं तिखट असतात म्हणजे उग्र चवीची असतात.
  • तवा चांगला गरम झाल्यावर त्याला तेल लावावं,
  • तेल लावताना आम्ही झाडीतल्या बायका पपईच्या पानाला देठ तसंच ठेवून गोल कापतो म्हणजे साधारणतः ते रवीसारखं दिसतं.
  • त्यानं तव्याला तेल लावायचं व
  • त्यावर हे मिश्रण पळीभर टाकायचं आणि
  • आंब्याचे/पेरूचे पान दुमडून त्याला उदबत्तीची काडी टोचायची.
  • त्याने हे मिश्रण संपूर्ण तवाभर छान गोल पसरवायचे आणि
  • ते पान ठेवताना वाटीत पाणी घेऊन त्यात ठेवायचे म्हणजे त्याला चिकटलेले मिश्रण निघून जाते.
  • मिश्रण व्यवस्थित तव्यावर पसरवलं की, त्यावर खोल ताट झाकायचं जेणेकरून आतला पदार्थ वाफेवर व्यवस्थित शिजेल.
  • 'चिले' शिजले की 'सण्ण' असा आवाज येतो
  • वरचं झाकण काढुन सरात्यानं/उलथण्यानं चिल्या'ची बाजु बदलावी आणि
  • चिला तव्यावरून काढून घ्यावा.
  • गरमागरम श्रावणदोसा 'चिले' अथवा अक्षा तयार होतो.
  • जे चिले नुसते खायलाही छान लागतो किंवा त्यासोबत तिखट वांग्याची भाजी तोंडी लावायला असली की. आणखीच बहार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.