Halaman

    Social Items

मावा कोफ्ता रेसीपी मराठी | मेवा मावा मलाई कोफ्ता | खोया / मावा कोफ्ता काजू करी | Khoya / Mava Kofta in Kaju curry | Mewa Mawa Kofta | kofta curry | mawa kofta | meva kofta recipe in Marathi

 मावा कोफ्ता रेसीपी मराठी | मेवा मावा मलाई कोफ्ता | खोया / मावा कोफ्ता काजू करी | Khoya / Mava Kofta in Kaju curry Mewa Mawa Kofta | kofta curry | mawa  kofta | meva kofta recipe in Marathi






साहित्य -


  • १०० ग्रॅम मावा,
  • २ टे. स्पू. डाळीचं पीठ,
  • १ वाटी उकडून मॅश केलेले बटाटे,
  • १ वाटी दह्याचा चक्का,
  • मीठ,
  • लाल तिखट,
  • २ टे. स्पू. बेदाणे,
  • दोन टे. स्पू. काजूची भरड पूड,
  • चिरलेली कोथिंबीर
  • तेल,
  • २ टे. स्पू. दही आणि
  • १ टी. स्पू. साखर.






मसाला वाटण -


  • दोन कांदे,
  • १ इंच आल्याचा तुकडा,
  • ८-१० लसूण पाकळ्या,
  • हळद,
  • लाल तिखट आणि
  • अर्धी वाटी खोवलेला नारळ.






कृती -


  • मावा भाजून घ्यावा.
  • त्यात बटाट्याचा लगदा, चक्का. मीठ, लाल तिखट, बेदाणे, काजूची भरड, कोथिंबीर, डाळीचं पीठ मिक्स करून चांगलं मिसळून घ्यावं.
  • कढईत तेल गरम करून मध्यम आकाराचे गोळे बनवून सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळावेत.
  • कोफ्त्याच्या ग्रेव्हीसाठी एका कढईत थोडं तेल टाकून त्यात वाटलेला मसाला टाकून खरपूस वास येईपर्यंत मसाला भाजावा.
  • नंतर त्यात दही, पाणी, साखर आणि मीठ घालून एक उकळी येऊ द्यावी.
  • चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.
  • सर्व्ह करताना डिशमध्ये कोफ्ते ठेवून त्यावर गरम ग्रेव्ही घालावी. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.