Halaman

    Social Items

बीट गाजर पुलाव रेसीपी मराठी | चुकंदर गाजर चावल | BEETROOT carrot RICE I Pulav Recipe in Marathi I how to make beetroot carrot bhat I Carrot And beetroot pulao | Gajar chukandar Pulav | Mix Vegetable Pulav

 बीट गाजर पुलाव रेसीपी मराठी | चुकंदर गाजर चावल | BEETROOT carrot RICE I Pulav Recipe in Marathi I how to make beetroot carrot bhat I  Carrot And beetroot pulao | Gajar chukandar Pulav | Mix Vegetable pulav








आयुर्वेद शास्त्राने आहारामध्ये षडरसांचा अंतर्भाव सांगितला आहे. म्हणून आपण गृहिणींनी या मधुर, आम्ल, लवण, कडू, तिखट व तुरट सहा (रसांच्या) चवींचा उपयोग पदार्थांमध्ये करायला हवा. ही योजना सकाळपासून रात्रीपर्यंतच्या आहारामध्ये करता येते. या सहा रसयुक्त पदार्थामधूनच सर्व पोषक घटक मिळत असतात. पिष्ठमय पदार्थ, प्रथिने, स्नेह, खनिज, जीवनसत्वे यांचा आपोआपच अंतर्भाव होत जातो. स्त्रियांमध्ये विविध पदार्थ करण्याची कल्पकता असते. मला आवडणाऱ्या, मुलांना पोषक मूल्य देणाऱ्या काही पाककृती देत आहे, त्या रुची तर वाढवतीलच शिवाय पोषणही करतील.




बीट, गाजर बरेचदा विशेष चव नसल्याने नुसते खावेसे वाटत नाही. अशा वेळेस पुलाव बऱ्यापैकी आकर्षक व पौष्टिक ठरतो. ताजी गाजरे महागड्या फळांपेक्षा व इतर भाज्यांपेक्षा उत्तम शरीरवर्धक आहेत. जीवनसत्व 'अ' सोबतच प्रथिने, कार्बोहायड्रेट, यात असतो. बीटदेखील रक्तवर्धक, शरीरात एक प्रकारची शक्ती व चैतन्य आणणारे आहे.




साहित्य :


  • १ बिटाचा व २ गाजरांचा किस,
  • अर्धी वाटी वाटाणे,
  • २ वाट्या तांदूळ + २ वाट्या पाणी असा मोकळा भात,
  • खोबऱ्याचा किस,
  • पनीरचे तळलेले तुकडे १०-१५,
  • तेल/तूप,
  • जिरे,
  • तमालपत्र,
  • तिखट,
  • गरम मसाला,
  • मीठ,
  • हिरवी मिरच्याचे लांब तुकडे ४-५,
  • कोथिंबीर.






कृती :


  • तेल/तूप कढईमध्ये टाकून जिरे, तमालपत्र घातल्यावर
  • दोन्ही किस टाकून परतावे.
  • वाटाणे टाकून एक वाफ घ्यावी.
  • नंतर भात टाकल्यावर चवीप्रमाणे तिखट, मसाला, मीठ मिसळून घ्यावे.
  • शेवटी पनीरचे तुकडे व हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकून एक वाफ घ्यावी.
  • भात मऊ/मोकळा जसा हवा तसा पाण्याचा शिपका मारता येईल.
  • वरून कोथिंबीर व खोबऱ्याचा किस पेरावा.
  • ताक/मठ्ठा सोबतची चव सर्वांनाच आवडेल.
  • बीट व गाजरचे अति सेवन मंदाग्नि असलेल्या, आम्लपित्त असणाऱ्यांसाठी योग्य नसते.
  • मात्र असा पुलाव त्यांनाही लाभदायी ठरेल.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.