वांग्याची भाजी रेसीपी मराठी | घोटलेल्या वांग्याची भाजी रेसिपी | वांग्याची रस्सा भाजी | हिरवी वांग्याची भाजी | झटपट हिरवी वांग्याची भाजी | Hiravi Vangyachi Bhaji Recipe in Marathi | Brinjal Recipe | brinjal curry | Ghotlelya Wangyachi Bhaji Recipe in Marathi | Eggplant Sabji recipe | Vangyachi Bhaji | baingan ki subji | mashed brinjal subji
आयुर्वेद शास्त्राने आहारामध्ये षडरसांचा अंतर्भाव सांगितला आहे. म्हणून आपण गृहिणींनी या मधुर, आम्ल, लवण, कडू, तिखट व तुरट सहा (रसांच्या) चवींचा उपयोग पदार्थांमध्ये करायला हवा. ही योजना सकाळपासून रात्रीपर्यंतच्या आहारामध्ये करता येते. या सहा रसयुक्त पदार्थामधूनच सर्व पोषक घटक मिळत असतात. पिष्ठमय पदार्थ, प्रथिने, स्नेह, खनिज, जीवनसत्वे यांचा आपोआपच अंतर्भाव होत जातो. स्त्रियांमध्ये विविध पदार्थ करण्याची कल्पकता असते. मला आवडणाऱ्या, मुलांना पोषक मूल्य देणाऱ्या काही पाककृती देत आहे, त्या रुची तर वाढवतीलच शिवाय पोषणही करतील.
वांग्याची भाजी करण्यासाठी कोवळी व कमी बिया असलेली वांगीच योग्य. अन्यथा वायूकारक, आम्लपित्त, उष्णता वाढवणारी बऱ्याचदा स्त्रियांसाठी अयोग्य ठरतात. पावसाळ्यात म्हणूनच चार महिने आपण ती वर्ण्य करतो ते योग्यच. भाजीवेळी देठांचा वापर आवश्यक आहे. दोन प्रकारच्या भाज्या सांगत आहे.
1) साहित्य :
- १ पाव कोवळी,
- छोटी वांगी,
- तेल २ मोठे चमचे
- मीठ,
- तिखट चवीप्रमाणे.
कृती-
- वांगे देठासहित चिरून घ्यावी व त्यांना तिखट व मीठ एकत्र करून आतून लावून घ्यावे.
- नंतर कढईत तेल गरम करून वांगी टाकावी व
- शिजायला लागेल इतके पाणी घालावे.
- वांगी मऊ शिजू द्यावी व
- थोडासाच रस्सा असू द्यावा.
2) साहित्य :
- अर्धा किलो वांगे,
- तेल,
- हिंग,
- अद्रक,
- जिरे,
- धणेपुड,
- लाल मिरच्यांचे जाडसर तिखट,
- मीठ,
- कोथिंबीर.
कृती-
- कढईत/ पातेल्यात २-३ च. तेल टाकून जिरे, हिंग, अद्रक पेस्ट, हळद टाकल्यावर वांगी (चिरून- बारीक फोडी) टाकाव्या.
- थोड्या वेळाने लाल तिखट, धणे पूड, मीठ व कोथिंबीरच्या काड्या बारीक चिरून घालाव्या.
- भाजी अगदी मऊ शिजल्यावर रवीने घोटावी.
- अशी घोटीव भाजी खान्देशी पंगतीच्या जेवणाचे वैशिष्ट्य आहे.
- वरणपोळीचा काला व भाजी विशेषतः कष्टकरी शेतकऱ्यांसाठी " पोषक आहार ठरतो.
- हिवाळ्यात वांगी खाणे जास्त लाभदायी ठरतं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.