शेपू पुलाव रेसीपी मराठी | Dill Leaves Pulao Recipe in Marathi | Sabsige Soppu Pulao | Shepu Recipe | dill leaves rice | sabbasge soppu rice recipe | Dill Pulao Recipe
आयुर्वेद शास्त्राने आहारामध्ये षडरसांचा अंतर्भाव सांगितला आहे. म्हणून आपण गृहिणींनी या मधुर, आम्ल, लवण, कडू, तिखट व तुरट सहा (रसांच्या) चवींचा उपयोग पदार्थांमध्ये करायला हवा. ही योजना सकाळपासून रात्रीपर्यंतच्या आहारामध्ये करता येते. या सहा रसयुक्त पदार्थामधूनच सर्व पोषक घटक मिळत असतात. पिष्ठमय पदार्थ, प्रथिने, स्नेह, खनिज, जीवनसत्वे यांचा आपोआपच अंतर्भाव होत जातो. स्त्रियांमध्ये विविध पदार्थ करण्याची कल्पकता असते. मला आवडणाऱ्या, मुलांना पोषक मूल्य देणाऱ्या काही पाककृती देत आहे, त्या रुची तर वाढवतीलच शिवाय पोषणही करतील.
मधुर, दीपक, पाचक, बलशाली, शूल, वात, ज्वरनाशक असा शेपू, रक्त शुद्धीकारक आहे. याची भाजी एका विशिष्ट दुर्गंधीमुळे सर्वांना आवडत नाही. मात्र पुलाव आवडू शकतो.
साहित्य :
- अर्धा पाव निवडलेला शेपू,
- २ वाट्या तांदळ.
- तेल/तूप २ मोठे चमचे,
- जिरे,
- तमालपत्र,
- तिखट,
- गरम मसाला
- धणेपूड,
- लिंबाचा रस अर्धा च.,
- साखर अर्धा च.,
- मीठ चवीप्रमाणे
कृती :
- कूकरमध्ये २ वाट्या तांदूळ + २ वाट्या पाणी असा फडफडीत भात शिजवून घ्यावा.
- नंतर परातीत पसरवून ठेवावा कढईत तेल/तूप टाकून जिरे, तमालपत्र, शेपू टाकावा.
- थोडा वेळ परतल्यावर भात, तिखट, मसाला, धणे पूड प्रत्येकी एकच लिंबाचा रस, साखर, मीठ टाकून परतावे.
- नंतर २ च. तुप टाकून वाफ आणावी.
- शेपू योनीशूलनाशक, बाळंतीणीस दूध आणणारा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.