भोपळ्याचे सांबार रेसीपी मराठी | सांबर | Bhoplyache Sambar Recipe in Marathi | South Indian Sambar Recipe | How to make Sambar | Sambar Recipe in marathi | South indian style sambar | How To Make Vegetable Sambar | South Indian Curry
आयुर्वेद शास्त्राने आहारामध्ये षडरसांचा अंतर्भाव सांगितला आहे. म्हणून आपण गृहिणींनी या मधुर, आम्ल, लवण, कडू, तिखट व तुरट सहा (रसांच्या) चवींचा उपयोग पदार्थांमध्ये करायला हवा. ही योजना सकाळपासून रात्रीपर्यंतच्या आहारामध्ये करता येते. या सहा रसयुक्त पदार्थामधूनच सर्व पोषक घटक मिळत असतात. पिष्ठमय पदार्थ, प्रथिने, स्नेह, खनिज, जीवनसत्वे यांचा आपोआपच अंतर्भाव होत जातो. स्त्रियांमध्ये विविध पदार्थ करण्याची कल्पकता असते. मला आवडणाऱ्या, मुलांना पोषक मूल्य देणाऱ्या काही पाककृती देत आहे, त्या रुची तर वाढवतीलच शिवाय पोषणही करतील.
दुधी भोपळ्याची भाजी म्हटली की बरेच जण नाक मुरडतात पण हे सांबार जेवणाची चव वाढविणारे आहे. उष्ण प्रकृतीसाठी भोपळा उत्तम, तसेच रेचक, पित्त, कफनाशक, जड, रुची उत्पन्न करणारा, धातू पुष्ट करणारा, हृदयास हितकारी आहे.
साहित्य :
- अर्धा किलो बारीक चिरलेला भोपळा,
- २ वाट्या ताक (आंबटपणा, घट्टपणा यावर प्रमाण ठरवावे),
- २ मोठे चमचे डाळीचे पीठ,
- फोडणीसाठी तेल,
- मोहरी,
- जिरे,
- तिखट,
- हिरव्या मिरच्या,
- मीठ.
कृती-
- चिरलेला भोपळा कूकरमध्ये ठेवून १-२ शिट्या घ्यावा,
- ताक व पीठ, पाणी, मीठ मिसळून गॅसवर एक उकळी घ्यावी.
- नंतर भोपळा घालून थोड्या वेळात गॅस बंद करावा.
- वरून आवडेल तशी तिखट, मिरची यांची फोडणी घालावी.
वजन कमी करण्यासाठी फोडणी न घालताही घेता येईल. यामध्ये साळीच्या / ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा घातल्यास एक पोटभरू पदार्थ होऊ शकतो. असाच परवराचा सांबारही करता येतो. दुधी गर्भपोषक असल्याने सगर्भावस्थेत स्त्रियांना योग्य याचवेळी मलबद्धता दूर करणारा आहे. दुधी किसून मस्तकावर व कपाळावर बांधल्याने शरीरातील उष्णता शोषल्या जाते. ऊन लागल्यास याच्या दोन फोडी मस्तकावर बांधाव्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.