अमृत वडी रेसीपी मराठी | Amrit vadi recipe in Marathi | amrut wadi
साहित्य:-
- ३ वाट्या दही,
- १ पाव खवा,
- ५ वाट्या साखर,
- बदाम,
- पिस्ता,
- काजूचे काप,
- दुधात भिजवलेले थोडे केशर,
- वेलची,
- जायफळ पूड,
- पिठीसाखर थोडी.
कृती:-
- खवा प्रथम चांगला मऊ मळावा.
- त्यात दही-साखर मिसळावी व
- सर्व जाड बुडाच्या भांड्यात घालून शिजवावं.
- हाताला फडकं बांधावं नाहीतर सर्व मिश्रण शिवजताना हातावर उडतं व चटके बसतात.
- घट्टसर गोळा होवून कडेने सुटू लागलं की त्यावर केशर, वेलची, जायफळ पूड मिसळून थोडं हळूहळू घोटत रहावं.
- एका ताटात अगोदरच पिठीसाखर सर्व बाजूने पसरावी.
- कडेने साखर जमू लागली की गोळा ताटात थापावा.
- थापताना हाताला चटके बसतात म्हणून वाटीने सारखा थापावा.
- वर बदाम पिस्ता, काजूचे काप पसरावे.
- साधारण गार झाल्यावर वड्या पाडाव्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.