कणीक पोहे चिवडा रेसीपी मराठी | Wheat flour Poha Chivada Recipe in Marathi | Kanic Poha Chivada
साहित्य -
- कणीक ३ वाटी,
- बारीक रवा २ वाटी,
- शेंगदाणे १/२ वाटी,
- खोबरा तुकडे (काप) १/२ वाटी,
- पाव वाटी काजू,
- आमचूर पावडर,
- बडी शोप पावडर,
- पिठी साखर प्रत्येकी २ चमचे,
- हिरवी मिर्ची तुकडे व
- चिरलेला कढीपत्ता,
- कोथींबीर चिरलेली प्रत्येकी २ चमचे,
- धने पूड,
- जिरे पूड प्रत्येकी २ चमचे,
- तिखट,
- मीठ,
- हळद चवीनुसार,
- तळणासाठी तेल,
- चिवडा मसाला १ चमचा.
- डाळ्या ४ चमचे.
कृती -
- परातीत कणीक व रवा किंचित मीठ व डाव तेलाचे कडकडीत मोहन घालून घट्ट भिजवून घ्या.
- गोळ्यांचे उंडे करून जाड किसणीवर किसून घ्या.
- गॅसवर कढईत गरम तेलात किस तळून पेपरवर तेल शोषायला ठेवा.
- नंतर उरलेल्या तेलात शेंगदाणे, डाळ्या, खोबरे काप, काजू तळून पेपरवर टाका.
- अगदी थोड्या तेलात मिर्ची तुकडे व कढीपत्ता खमंग झाल्यावर गॅस बंद करा.
- गरम तेलात सर्व पावडर, तिखट मीठ, हळद, आमचूर पावडर, पिठी साखर, चिवडा मसाला टाकून मोठ्या बाऊलमध्ये सर्व साहित्य एकत्र करा.
- थंड झाल्यावर हा चिवडा डब्यात भरा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.