कलिंगडाच्या पांढल्या गराचे धिरडे रेसीपी मराठी | टरबूज धिरडे | Watermelon Dhirade Recipe in Marathi | Tarbuj dhirade
साहित्य-
- तांदुळ पिठी २ वाट्या,
- किसलेता पांढरा गर १वाटी,
- हिरवी मिरची पेस्ट २ चमचे,
- साखर एक चमचा,
- मिरेपुड १/२ चमचा,
- भाजलेला (कोरडा) रवा ४ चमचे,
- चवीनुसार मीठ,
- पॅनला लावण्यापुरते तेल
कृती-
- कलिंगडाच्या गरात तांदुळ पिठी, रवा, मिरची पेस्ट, साखर, मीठ, जिरेपूड मिक्स करा.
- पॅनवर धिरडी घालण्याइतपत पीठ पातळ करा, (लागल्यास थोडं पाणी टाका)
- गॅसवर नॉनस्टीकला किंचित तेल लावून धिरडी करा.
- चटणीसोबत गरम गरम सर्व्ह करा.
टीप-
- कलिंगड कापल्यावर आपण पांढरा भाग वापरत नाही.
- या रेसीपीद्वारे त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो.
- कलिंगडाच्या बिया वाळवून (कडक उन्हात) रात्रभर भिजवल्यावर सोलून त्याचाही उपयोग गोड पदार्थांमध्ये होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.