Halaman

    Social Items

टोमॅटो सुरळीची वडी रेसीपी मराठी | खांडवी | Khandvi recipe in Marathi | Surlichi wadi recipe | How to make khandvi at home | Gujarati khandvi recipe | Easy method of khandvi recipe

 टोमॅटो सुरळीची वडी रेसीपी मराठी | खांडवी | Khandvi recipe in Marathi | Surlichi wadi recipe | How to make khandvi at home | Gujarati khandvi recipe | Easy method of khandvi recipe






साहित्य- 


  • लालबूंद टोमॅटो ४, 
  • बॅन्डेड बेसन १ वाटी, 
  • मैदा ४ चमचे, 
  • ओले नारळ किस ४ चमचे, 
  • चिरलेली कोथिंबीर ४ चमचे. 
  • लिंबू रस १ चमचा, 
  • साखर २ चमचे, 
  • तेल १ डाव, 
  • फोडणीपरते हिंग. 
  • मोहरी, 
  • जीरे, 
  • कढीपत्ता, 
  • चवीनुसार मीठ.







कृती- 


  • टोमॅटो उकडून साल व बिया काढून मिक्सीतून पल्प करा. 
  • बारीक चाळणीने गाळून घ्या. 
  • जाड बुडाच्या पातेल्यात बेसन, मैदा, मीठ साखर व १ वाटी पाणी टाकून डावाने एकजीव करा. 
  • नंतर त्यात लिंबूरस व टोमॅटोचा पल्प टाकून मिक्स करा. 
  • गॅसवर पातेले ठेवून पिठल्यासारखे खदखदा शिजू द्या. 
  • सतत ढवळत राहा. 
  • गुठळी जमायला नको. 
  • बेसन कडेने सुटत आले की शिजले समजावे. 
  • ताटाला थोडं तेल लावून डावाने बेसन फिरवा. 
  • त्यावर ओले खोबरे, कोथिंबीर टाका वरून हिंग, मोहरी जीरे कढीपत्त्याची फोडणी द्या. 
  • थंड झाल्यावर सुरीने कापून वळकटीसारखे गुंडाळून गोल करा. 
  • लुसलुशीत टोमॅटो सुरळी वड्या सगळ्यांनाच आवडतील.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.