पालक शंकरपाळे (नमकिन) रेसीपी मराठी |
हरी भरी नमकीन | Palak Shankarpali | Shankarpale | Spinach Snack | Palak Namak pare | Spinach fritters | Spinach Shankarpali Recipe in Marathi
साहित्य -
- स्वच्छ धुवून चिरलेला पालक २ वाटी,
- संपादेल एवढा मैदा,
- बेसन,
- रवा प्रत्येकी १/२ वाटी,
- अद्रक,
- हिरवी मिर्ची,
- लसूण पेस्ट प्रत्येकी १ चमचा,
- तीळ,
- ओवा प्रत्येकी २ चमचे,
- साखर १ चमचा,
- चवीनुसार तिखट,
- मीठ,
- चिमूटभर हिंग,
- तेल,
- निंबूरस २ चमचे.
कृती -
- गॅसवर कढईत गरम तेलात (१ चमचा) चिरलेला पालक, सर्व पेस्ट साखर, तिखट, मीठ, हिंग टाकून पालक मऊसर वाफवून घ्यावा.
- गार झाल्यावर मिक्सीतून वाटा.
- वाटणात मैदा, रवा, मोहन घाला.
- तीळ, ओवा, लिंबूरस टाकून घट्ट भिजवून शंकरपाळे कापा.
- गरम तेलात तळा.
- तळलेली शंकरपाळी पेपरवर तेल शोषायला पसरवून ठेवा.
- नंतर डब्यात भरा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.