पाजम पायसम रेसीपी मराठी | Pajam Payasam Recipe in Marathi | Sweet Recipe
साहित्य :
- पिकलेली केळी २,
- १/२ वाटी किसलेला गूळ,
- १/२ वाटी किसलेले खोबरे,
- २ टे. स्पू. नारळाचे काप,
- २ टे. स्पू शेंगदाणे,
- १ टी. स्पू. तांदळाचे पीठ,
- दोन वाटी नारळाचे दूध/तूप.
कृती :
- केळी कुकरमध्ये पाणी न टाकता शिजवून घ्या.
- गूळ पाणी घालून उकडून गाळून घ्या.
- नारळाच्या दुधात तांदळाचे पीठ मिक्स करून गरम करायला ठेवा.
- नारळाचे काप व शेंगदाणे तुपात तळून बाजूला ठेवा.
- नारळाच्या दुधाला उकडी आल्यावर त्यात गुळाचे पाक, कुस्करलेली केळी, किसलेले खोबरे टाकून मिश्रण सतत ढवळा.
- जास्त घट्ट होऊ देऊ नका.
- शेंगदाणे व नारळाचे काप वर टाकून सर्व्ह करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.