Halaman

    Social Items

कुजी पानियारम रेसीपी मराठी | Kuzhi Paniyaram Recipe in Marathi

 कुजी पानियारम रेसीपी मराठी | Kuzhi Paniyaram Recipe in Marathi







साहित्य : 


  • उकडा तांदूळ १ वाटी, 
  • अर्धी वाटी उडीद डाळ, 
  • २ टे.स्पू. साबुदाणे, 
  • १ टी.स्पू. मेथी दाणे, 
  • १ टे. स्पू. आले, 
  • हिरवी मिरची पेस्ट, 
  • बारीक चिरलेली कोथिंबीर व 
  • कढीलिंबाची पाने, 
  • मीठ चवीनुसार, 
  • खायचा सोडा १/२ टी.स्पू., 
  • तेल, 
  • १ बारीक चिरलेला कांदा.





कृती : 


  • तांदूळ-डाळ-साबुदाणेमेथीदाणे भिजत घालावे, 
  • मिक्सरमधून जाडसर दाट काढावे. 
  • ८-१० तास बाजूला ठेवा. 
  • करायचा वेळेस मिरची पेस्ट, कांदे, कोथिंबीर, मीठ, कढीलिंबाची चिरलेली पाने, खायचा सोडा मिक्स करावे. 
  • आप्पे पात्र गॅसवर ठेवून थोडे तेल टाकून २ चमचे तयार पीठ टाकावे. 
  • मंद गॅसवर झाकण ठेवा. 
  • दोन मिनिटांनी झाकण काढून अलगद पलटुन थोडे तेल वर सोडा. 
  • दुसरी बाजु झाल्यावर गरम आप्पे सर्व्ह करावे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.