कोहळं व ओल्या नारळाचे रायते रेसीपी मराठी | रायते रेसीपी | Kohale, olya Naralache Raita Recipe in Marathi| Pumpkin, Coconut Raita
साहित्य-
- लाल भोपळ्याच्या सालं काढलेल्या फोडी १ वाटी,
- ओल्या नारळाचा चव १/२ वाटी,
- बेसन ४ चमचे,
- कॉर्नफ्लोअर २ चमचे,
- साखर २ चमचे,
- चिरलेली कोथिंबीर ४ चमचे,
- चवीनुसार मीठ,
- हिरवी मिरची पेस्ट १ चमचा,
- तळणासाठी तेल,
- ताजे घट्ट दही २ वाटी.
कृती-
- कुकरमध्ये कोहळ्याच्या फोडी मऊ शिजवून गार झाल्यावर डावाने घोटून घ्या.
- त्यात नारळाचा चव, बेसन, कॉर्न फ्लोअर, मिर्ची पेस्ट, मीठ टाकून गरम तेलात पकोडे (छोटे-छोटे कंचाएवढे) तळा.
- बाऊलमध्ये दही फेटून घ्या.
- त्यात पकोडे टाका.
- दह्यात चवीनुसार मीठ व साखर घाला.
- वरून चिरलेली कोथिंबीर टाका.
- वेगळ्या प्रकारचे व चवीचे रायते तयार.
टीप -
हिरवी मिरची, कोथिंबीर न टाकता थोडी जास्त साखर दह्यात टाकून गोड रायते पण चविष्ट होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.