Halaman

    Social Items

रस्सा (ग्रेव्ही) रेसीपी मराठी | Gravy for Veg or non veg recipe in Marathi | Rassa Recipe

 रस्सा (ग्रेव्ही) रेसीपी मराठी | Gravy for Veg or non veg recipe in Marathi | Rassa Recipe






साहित्य-


  • कांदा (मध्यम) १ चिरलेला 
  • टोमॅटो १/२ वाटी, 
  • चिरलेले कोथिंबीर, 
  • अद्रक पेस्ट १ चमचा, 
  • लसूण पेस्ट २ चमचे
  • ओले नारळ किस ४ चमचे, 
  • खसखस १ चमचा, 
  • जीरे १ चमचा, 
  • धने २ चमचा,
  • कलमीचा थोडा तुकडा, 
  • मिरी दाणे ४ 
  • मोठी विलायची २, 
  • लवंगा २, 
  • शेंगदाणे १ चमचा, 
  • पोहे २ चमचे, 
  • मटन मसाला १/२ चमचा, 
  • तेजपान लहान १, 
  • तिखट, 
  • मीठ चवीनुसार, 
  • फोडणीपुरते जीरे, 
  • मोहरी, 
  • तेल १/२ वाटी.






कृती-


  • प्रथम कांदा गॅसवर भाजुन घ्या 
  • गार झाल्यावर वरचं काळं साल काढुन टाका, 
  • पॅनमध्ये धने, खसखस, दाणे, लवंग, कलमी, मिरी, वेलदोडा थोडं तेल टाकुन भाजा, 
  • चिरलेला टोमॅटो पण तेलात परता, 
  • मसाला मिक्सीतुन बारीक वाटा, 
  • गॅसवर पातेल्यात गरम तेलात मिरे, मोहरी तडतडल्यावर तेजपान टाका, 
  • नंतर मसाल्याच वाटण टाका, 
  • तेलात छान परतवा, 
  • गॅस कमी करून पातेलं झाका, 
  • ५-१० मिनिटानी गॅस मोठा करून त्यात पाणी सोडा, 
  • पाण्याचे प्रमाण आपल्या आवडीनुसार ठेवा, (रस्सा पातळ हवा असल्यास पाणी थोड जास्त घाला.) 
  • पातेल्यावर झाकणी झाकून रस्सा चांगला उकळु द्या, 
  • गॅस बंद केल्यावर मटन मसाला व कोथिंबीर घाला, 
  • सर्व्ह करताना बाऊलमध्ये वडीवर हा गरम रस्सा घाला. 
  • गरम भाकरी किंवा नुसत्या गरात प्लेन राईस सोबत मस्त लागतो. 
  • सोबत कांद्याची कोशिंबीर ठेवा.




टीप- 


  • कांदा तेलात न भाजता गॅसवर भाजल्याने ग्रॅव्हीला झणझणीत चव व खमंग वास येतो.
  • पोह्यांचा चिवडा असल्यास त्यातीलच पोहे, डाळ, खोबरे व शेंगदाणे मसाल्यात वापरता येतात.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.