Halaman

    Social Items

मालपुआ रेसीपी मराठी | Malpua Recipe in Marathi | Dessert | Sweet Recipe

 मालपुआ रेसीपी मराठी | Malpua Recipe in Marathi | Dessert | Sweet Recipe







साहित्य - 


  • अर्धा किलो खवा, 
  • चार कप दूध, 
  • सहा मोठे चमचे मैदा, 
  • चार वाट्या साखर, 
  • चार चमचे बदामाची पूड, 
  • चार चमचे काजू पूड, 
  • चार चमचे बेदाणे, 
  • केशर, 
  • वेलची पूड, 
  • चांदीचा वर्ख, 
  • तळणीसाठी तूप.





कृती- 


  • अर्धा कप दुधात बेदाणे भिजत ठेवा. 
  • थोड्या दुधात केशर खलून घ्या. 
  • खवा हाताने मऊ करून सर्व गुठळ्या मोडून घ्या. 
  • खवा चांगला मळून घ्या. 
  • एका पातेल्यात खवा, मैदा व दूध घालून सरबरीत पीठ तयार करा. 
  • त्यात भिजवलेले बेदाणे, केशर, वेलदोडा पूड, बदाम काजू पावडर घालून मिश्रण चांगले ढवळा व 
  • दोन तास झाकून ठेवा. 
  • एका पातेल्यात साखरेचा एकतारीपेक्षा थोडा कमी चिकट पाक तयार करा. 
  • नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये थोडे जास्त तूप घाला. 
  • तूप तापल्यावर डावाने एकेक पळी मैद्याचे मिश्रण ओतून पुरीएवढी लहान पण जरा जाडसर धिरडी घाला. 
  • एका वेळी दोन-तीन मालपुअे करू शकता. 
  • मालपुअे तयार होताना झाऱ्याने त्याच्यावर तूप सोडत राहावे. 
  • दोन्ही बाजूनी लालसर तळल्यावर मालपुअे नीट निथळून बाहेर काढा. 
  • साखरेच्या पाकात घाला. 
  • दोन-तीन मिनिटांनी मालपुअे पाकातून निथळून बाहेर काढा 
  • व प्लेटमध्ये ठेवा. 
  • वरून चांदीचा वर्ख लावून गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवा



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.