सोया खीर रेसीपी मराठी | सोयाबीन की खीर | Soyabean ki Kheer | Soya Kheer Recipe in Marathi | Kheer Recipe
सोयामध्ये प्रोटीन्स व पोषक घटक दूध व डाळीच्या तुलनेत कित्येक पटींनी जास्त आहेत. कमीत कमी कॅलेस्ट्रॉल, पचायला हलका व स्वास्थकर असल्याबरोबरच हे किफायती पण आहे.
साहित्य:-
- १ वाटी सोया,
- ५०० मिली लीटर दूध,
- ६ टे-स्पून साखर,
- १ टेस्पून कणिक,
- १ टे-स्पून तूप,
- ड्रायफ्रूटस काप,
- वेलची,
- जायफळ पावडर १ टी स्पून.
कृती:-
- तुपात सोया परतून मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या.
- वाटण दूधात टाकून उकडायला ठेवा.
- गरम झाल्यावर साखर टाका.
- थोड्या दुधात कणिक मिक्स करून त्यात टाका व
- उकडल्यावर ड्रायफ्रूटस व काप व वेलची, जायफळ पावडर टाकून गॅस बंद करा व
- गरमागरम सर्व्ह करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.