आम्रपाली रेसीपी मराठी | Amrapali Recipe in Marathi | Mango recipe | Dessert
साहित्य -
- अर्धा लिटर दूध,
- एक कप आंब्याचा पल्प,
- एक चमचा मिल्क पावडर किंवा कॉर्नफ्लोअर,
- एक वाटी जाड शेवया,
- बदामाचे काप,
- साखर,
- व्हॅनिला इसेन्स.
कृती-
- दूध उकळण्यास ठेवावे.
- त्यामध्ये थोड्या दुधात कालवलेली मिल्क पावडर, साखर घालून परत उकळवा.
- दूध गार झाल्यावर त्यामध्ये आंब्याचा रस घालून मिक्सरमधून घुसळून घ्या.
- त्यात व्हॅनिला इसेन्स घालून दूध फ्रिजमध्ये ठेवुन गार करा.
- जाड शेवया या गरम पाणी व साखरेमध्ये घालून शिजवा.
- शिजल्यावर निथळून गार केलेल्या दुधात घाला.
- नंतर त्यात बदामाचे काप, चारोळी घालून सर्व्ह करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.