नारळाचे पदार्थ | नारळाच्या तिखट वड्या | Naralache Padarth | Naralachya Tikhat Vadi Recipe in Marathi | Coconut Vadi
साहित्य-
- ओल्या नारळाचा कीस २ वाट्या,
- बेसन अंदाजे- २-३ चमचे,
- गूळ,
- चिंचेचा कोळ,
- हळद,
- मीठ,
- सांबऱ्याचा मसाला,
- हिरवी मिरची
- कोथिंबीर
- तळण्याकरिता तेल,
कृती-
- प्रथम चिंचेचा कोळ थोडा गूळ टाकून तयार करावा.
- हिरव्या २-३ मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात.
- कोथिंबीर बारीक चिरावी.
- नंतर ओल्या खोबऱ्यात गूळ चिंचेचा कोळ, हळद, मीठ, सांबऱ्याचा मसाला, मिरच्या वाटलेल्या, कोथिंबर घालावी व
- वड्या तयार करता येतील इतपत बेसन मिसळून सर्व जिन्नस एकजीव करावेत.
- त्याच्या गोल किंवा चौकोनी-चपट्या वड्या करून तेलात तळून काढाव्यात.
- रूचकर लागतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.