सातुचे मुटकुळे रेसीपी मराठी | Mutukule of barley | Satuche Mutakule Recipe in Marathi
मुटकुळे हा पदार्थ खेड्यात जास्त प्रमाणात केला जातो
कारण खेड्यात शेतात गहु, बाजरी, ज्वारी, हरभरा, वाटाणा ही सर्व धान्ये पेरतात. शेती करणारे लोक खेड्यात जास्त प्रमाणात आढळल्यामुळे सर्व प्रकारची धान्ये त्यांना मिळतात व भाज्या महाग व शहराप्रमाणे प्रकार कमी असल्याने घरच्या धान्याचे पदार्थ भाज्यांऐवजी केले जातात. 'मुटकुळे' हा प्रकार पीठ भिजवून मुठीत दाबून करतात. त्यामुळे मुठे किंवा मुटकुळे हे नाव पडले. साधा चवदार, सोपा अशा मुटकुळ्याचे प्रकार बघू या.
साहित्य-
- ३ वाट्या सातू,
- तिखट,
- मीठ,
- हळद,
- धणे,
- जिरेपूड,
- तीळ,
- गूळ (साधारण खडे ठेवून बारीक केलेला)
- लसूण ३-४ पाकळ्या,
- तेल व
फोडणीचे साहित्य,
- कोथिंबीर,
- हिरव्या मिरच्या,
- आलं याची पेस्ट,
- दही साधारण आंबट.
कृती-
- प्रथम लसूण, मिरच्या, जिरे, आलं वाटून पेस्ट करावी.
- तीळ भाजावे.
- नंतर सातूमध्ये मोहन टाकून फोडणी सोडून सर्व साहित्य मिसळावे व दही (पाणी जरूर असल्यास) टाकून भिजवून गोळा करावा.
- गुळाचे बारीक खडे मुद्दाम मिसळावेत.
- कारण मुटकुळे खाताना गुळाच्या खड्याची चव येते.
- गोळा मऊ करून मुटकुळे करावेत व
- कढईत फोडणी करून ते त्यात टाकावे. (तळू नये)
- कढई सांडशीने धरून वरखाली करावी म्हणजे मुटकुळ्याला तेल लागेल,
- नंतर मंदाग्नीवर कढई ठेवून सर्व बाजूने सराट्याने मुटकुळे हळूहळू हलवावे म्हणजे खरपूस होतात.
- प्लेटमध्ये ठेवून कोथिंबीर टाकून सर्व्ह करावे.
- आंबट-गोड असे सातूचे मुठे छान लागतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.