Halaman

    Social Items

मेथीचे मुटकुळे रेसीपी मराठी | मेथीचे मुटके | मेथी मुथिया | मेथी मुठीया | Methi Muthia Recipes in Marathi | Methi Muthias, Gujarati Methi Muthia | Methi Muthiya

 मेथीचे मुटकुळे रेसीपी मराठी | मेथीचे मुटके | मेथी मुथिया | मेथी मुठीया | Methi Muthia Recipes in Marathi  | Methi Muthias, Gujarati Methi Muthia | Methi Muthiya  




मुटकुळे हा पदार्थ खेड्यात जास्त प्रमाणात केला जातो

कारण खेड्यात शेतात गहु, बाजरी, ज्वारी, हरभरा, वाटाणा ही सर्व धान्ये पेरतात. शेती करणारे लोक खेड्यात जास्त प्रमाणात आढळल्यामुळे सर्व प्रकारची धान्ये त्यांना मिळतात व भाज्या महाग व शहराप्रमाणे प्रकार कमी असल्याने घरच्या धान्याचे पदार्थ भाज्यांऐवजी केले जातात. 'मुटकुळे' हा प्रकार पीठ भिजवून मुठीत दाबून करतात. त्यामुळे मुठे किंवा मुटकुळे हे नाव पडले. साधा चवदार, सोपा अशा मुटकुळ्याचे प्रकार बघू या.




साहित्य-


  • कणिक,
  • ज्वारीचे पीठ किंवा बेसण समप्रमाण (१ वाटी),
  • २ वाट्या ताजी हिरवी मेथीची भाजी चिरलेली,
  • हिरव्या मिरच्या आलं,
  • जिरे
  • धणेपुड याचे वाटण,
  • लाल तिखट,
  • मीठ,
  • साखर,
  • लिंबाचा रस चवीप्रमाणे,
  • तेलाची मोहरी
  • हिंग,
  • मेथ्याची फोडणी,
  • कोथिंबीर
  • हळद.





कृती-


  • कणिक व बेसन एकत्र करून त्यात स्वच्छ धुवून बारीक चिरलेली मेथीची भाजी घालावी.
  • त्यात तेलाचे मोहन टाकून बाकीचे साहित्य मिसळावे व
  • आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ भिजवून गोळा करावा व
  • थोडे तेल टाकून मळावा.
  • त्याचे मुटकुळे करून वाफवावेत.
  • थंड झाल्यावर चाकूने गोल काप करावेत.
  • कढईत फोडणीवरून त्यात हे काप टाकून चांगले वरखाली करून मिसळावेत.
  • म्हणजे कापाला फोडणी सगळीकडे लागेल.
  • वरून कोथिंबीर व खोबरे टाकून गरमागरमच खावयास द्यावेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.