भाज्या मिश्रित मुठीया रेसीपी मराठी | Mix Vegetables Muthiya Recipe in Marathi
मुटकुळे हा पदार्थ खेड्यात जास्त प्रमाणात केला जातो
कारण खेड्यात शेतात गहु, बाजरी, ज्वारी, हरभरा, वाटाणा ही सर्व धान्ये पेरतात. शेती करणारे लोक खेड्यात जास्त प्रमाणात आढळल्यामुळे सर्व प्रकारची धान्ये त्यांना मिळतात व भाज्या महाग व शहराप्रमाणे प्रकार कमी असल्याने घरच्या धान्याचे पदार्थ भाज्यांऐवजी केले जातात. 'मुटकुळे' हा प्रकार पीठ भिजवून मुठीत दाबून करतात. त्यामुळे मुठे किंवा मुटकुळे हे नाव पडले. साधा चवदार, सोपा अशा मुटकुळ्याचे प्रकार बघू या.
साहित्य-
- १ किलो बेसण,
- कोबी,
- भोपळा (दुधी),
- गाजर अंदाजे १ पाव (प्रमाण कमी जास्त करता येते.) हिरव्या मिरच्या, ह्याची पेस्ट
- जिरे, ह्याची पेस्ट
- आलं, ह्याची पेस्ट
- धणेपूड ह्याची पेस्ट,
- तीळ भाजलेले २ चमचे,
- कोथिंबीर,
- ओले खोबरे,
- मोहरी
- तेल,
- हिंग,
- मेथी,
फोडणीसाठी,
- हळद,
- मीठ,
- लिंबू व
- साखर चवीप्रमाणे.
कृती-
- सर्व भाज्या किसाव्यात व बेसणात भाज्या व फोडणीचे साहित्य व कोथिंबीर, खोबरे, सोडून सर्व मिसळावे.
- थोडी कोथिंबीर टाकावी व
- बाकीचे शिल्लक ठेवावी.
- सर्व साहित्य मिसळल्यावर आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ भिजवावे.
- थोडे तेल टाकून पीठ चांगले मळावे.
- नंतर गोळ्याचे लांबट आकाराचे मुटकुळे (मुठीत दाबून) करून कुकरमध्ये शिटी न लावता किंवा मोदकपात्रात वाफवावेत.
- थंड झाल्यावर त्याचे जाडे काप करून तेल, मोहरी, हिंग, मेथ्या याची फोडणी करून ती त्या कापावर वरून घालावी.
- काप खालीवर करून फोडणी सगळीकडे लागेल असे करावे.
- नंतर वरून कोथिंबीर व खोबरे टाकून जेवणात वाढावे किंवा
- एका प्लेटमध्ये ठेवून बारीक शेव टाकून तसेही खाण्यास द्यावे.
- भाज्यामुळे मुटकुळे चवदार लागतात.
- भाताबरोबर किंवा मसालेदार रस्सा करून त्यात टाकूनही चांगले लागतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.