Halaman

    Social Items

दुधी भोपळ्याचे मुटकुळे रेसीपी मराठी | दुधी भोपळ्याची वडी | दुधीचे मुटकुळे | लौकी के मुठिया रेसिपी | लौकी की वडी | Doodhi vadi | Lauki ki Muthia Recipe in Marathi| Dudhi che Mutkule | Lauki Ki Vadi Recipe

 दुधी भोपळ्याचे मुटकुळे रेसीपी मराठी | दुधी भोपळ्याची वडी | दुधीचे मुटकुळे |
लौकी के मुठिया रेसिपी | लौकी की वडी |
 Doodhi vadi | Lauki ki Muthia Recipe in Marathi| Dudhi che Mutkule | Lauki Ki Vadi Recipe





मुटकुळे हा पदार्थ खेड्यात जास्त प्रमाणात केला जातो

कारण खेड्यात शेतात गहु, बाजरी, ज्वारी, हरभरा, वाटाणा ही सर्व धान्ये पेरतात. शेती करणारे लोक खेड्यात जास्त प्रमाणात आढळल्यामुळे सर्व प्रकारची धान्ये त्यांना मिळतात व भाज्या महाग व शहराप्रमाणे प्रकार कमी असल्याने घरच्या धान्याचे पदार्थ भाज्यांऐवजी केले जातात. 'मुटकुळे' हा प्रकार पीठ भिजवून मुठीत दाबून करतात. त्यामुळे मुठे किंवा मुटकुळे हे नाव पडले. साधा चवदार, सोपा अशा मुटकुळ्याचे प्रकार बघू या.




साहित्य- 


  • ३ वाट्या दुधी भोपळ्याचा कीस, 
  • २ वाट्या कणिक, 
  • अर्धी वाटी बेसन, 
  • अर्धी वाटी सोजी, 
  • हळद, 
  • तिखट, 
  • मीठ, 
  • मिरच्या 
  • आलं जिऱ्याची पेस्ट, 
  • अर्धी लहान चमचा गरम मसाला, 
  • जिरं, 
  • लिंबाचा रस. 
  • साखर, 
  • कोथिंबीर, 
  • अर्धी लहान चमचा खाण्याचा सोडा, 
  • हिंग, 
  • तेल 




फोडणीचे साहित्य, 


  • तीळ 
  • कोथिंबीर,
  • खोबऱ्याचा कीस.
  • तेल





कृती- 


  • प्रथम दुधी भोपळ्याचा कीस पिळून त्यातील पाणी काढावे. 
  • त्यात कणिक व इतर साहित्य मिसळून मुटकुळे करा.
  • तेलाची फोडणी करा. 
  • त्यात मोहरी तडतडल्यावर हिंग व तीळ टाका. 
  • तयार केलेले मुटकुळे नेहमीप्रमाणे वाफवा व 
  • नंतर फोडणीच्या तेलात टाकून कोथिंबीर टाकून परता. 
  • बाऊलमध्ये काढून पुनः कोथिंबीर व खोबऱ्याच्या किसाने सजवून प्लेटमध्ये काढा व 
  • आंबटगोड चटणीबरोबर किंवा ओल्या नारळाच्या किसात गोड दही टाकून मीठ, साखर टाकून वरून मिरच्याची फोडणी दिलेल्या चटणीबरोबर खाण्यास द्या..




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.