खोबऱ्याचे शेवखंड रेसीपी मराठी | Khobaryache Shevkhand Recipe in Marathi | Coconut Shevkhand
साहित्य-
- खोबऱ्याचा कीस १ वाटी,
- १ वाटी मैदा,
- दीड कप दूध,
- २ चमचे पिठी साखर,
- १ वाटी जाडी साखर,
- पाव चमचा खाण्याचा सोडा,
- काजू पावडर,
- व्हॅनिला इसेन्स.
कृती-
- दुधात मैदा चांगला एकजीव मिसळावा.
- त्यात पिठीसाखर व खोबऱ्याचा कीस घालून मिश्रण चांगले जाडसर शिजवावे.
- त्यात काजू पावडर, सोडा व इसेन्स मिसळावे.
- नंतर चकल्याच्या साच्यात चकल्याची किंवा मोठ्या भोकाची चकती टाकून मैद्याचा तयार केलेला गोळा घालून जाड कांड्या (शेवखंडे) बटर पेपरवर पाडाव्या.
- या कांड्या गरम ओव्हनमध्ये ट्रेमध्ये ठेवून १०-१५ मिनिटे भाजून काढाव्या.
- साखरेचा पक्का पाक करून भाजून काढलेल्या शेवखंडावर ओतून शेवखंडे पाकात घोळवावीत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.