टरबुजाच्या सालीचे सांडगे रेसीपी मराठी | Watermelon Sandage Recipe in Marathi | Tarbujachya Saliche Sandage
साहित्य-
- टरबुजाचा लाल भाग काढून पांढरा भाग राहतो तो किसुन त्याचा किस,
- जाड पोहे,
- हिरवी मिरची,
- मीठ चवीप्रमाणे,
- धणे-जिरे पावडर,
- तीळ,
- आवडत असल्यास टमाटे,
- तसेच मुगवड्या करताना डाळ धुतल्यानंतर जी हिरवी साल निघते तीही घ्यावी.
कृती-
- टरबुजाच्या सालीतील राहिलेला पांढऱ्या भागाचा किस करून त्यात मावेल इतपत पोहे टाकावे. (पाणी फेकू नये),
- मीठ, मिरची व इतर वरील साहित्य टाकून मिसळावे.
- त्या मिश्रणाचे लहान लहान वडे करून उन्हात चांगले कडक वाळवावेत.
- खिचडीबरोबर तळलेले है वडे जेवणाची चव वाढवितात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.