बेसनभात रेसीपी मराठी | Maharashtra Recipe | BESAN RICE / GRAM FLOUR Recipe in Marathi
साहित्य-
- २ वाट्या जुना चांगला तांदूळ,
- अर्धी वाटी डाळीचे पीठ (बेसन),
- १ चमचा लाल तिखट,
- मीठ चवीनुसार,
- १ चमचा तीळ व
- २ चमचे कोरड्या खोबऱ्याचा कीस,
- ४-५ लसूण पाकळ्या,
- १ कांदा,
- १ हिरवी मिरची,
- जिर,
- आलं याची पेस्ट,
- कोथिंबीर
- चवीला लिंबाचा रस,
- तेल
फोडणीचे साहित्य,
- हिंग,
- हळद.
कृती-
- प्रथम तीळ व खोबऱ्याचा कीस कोरडा भाजावा.
- नंतर कढईत अर्धा डाव तेल गरम करून हिंग, मोहरी मिरचीचे तुकडे, भाजलेले तीळ, खोबरे टाकून परतावे.
- त्यात बेसन टाकून खमंग भाजून घ्यावे.
- नंतर थोडे तिखट, मीठ टाकून एकजीव करावे.
- हे भाजलेले बेसन गार होऊ दयावे.
- तासभर आधी तांदूळ धुऊन निथळून घ्यावे व
- त्याचा मोकळा भात शिजवावा.
- भात शिजल्यावर त्यात वरील भाजलेले बेसन, कोथिंबीर व थोडा लिंबाचा रस मिसळून भात कुकरमध्ये एक शिटी होईपर्यंत ठेवावा.
- म्हणजे चांगली वाफ येते किंवा
- तवा गॅसवर ठेवून वरील भात जाडबुडाच्या पातेल्यात टाकून ते पातेले तव्यावर ठेवून पातेल्यावर झाकण ठेवावे व
- मंद पण चांगली वाफ येऊ दयावी.
- भात गरम असतानाच सर्व्ह करावा व
- कैरीच्या आमटीबरोबर किंवा मुगाच्या फोडणीच्या वरणाबरोबर खाण्यास दयावा.
- हा भात फारच चवदार लागतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.