Halaman

    Social Items

बेदाणा / मनुका भात रेसीपी मराठी | Raisins Rice Recipe in Marathi | Bedana / Manuka bhat

बेदाणा / मनुका भात रेसीपी मराठी | Raisins Rice Recipe in Marathi | Bedana / Manuka bhat





साहित्य- 


  • २ वाट्या बासमती किंवा कोणताही लांब दाण्याचा जुना तांदूळ, 
  • १ वाटी बेदाणे, 
  • अर्धा पाव खवा, 
  • २ मिरच्यांचे तुकडे, 
  • अर्धी वाटी काजू, 
  • अर्धा चमचा पावभाजी मसाला, 
  • अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा कीस, 
  • चवीला साखर, 
  • मीठ, 
  • तूप, 
  • जिरं. 
  • २ लवंगा, 
  • २ मोठी वेलची, 
  • १ तमालपत्र. 




कृती- 


  • भात करायच्या १-१|| तास आधी तांदूळ धुवून निथळुन ठेवावेत. 
  • तेव्हाच बेदाणे धुवून निवडून दुधात भिजत घालावेत 
  • तांदळात लवंगा, मीठ व कमी पाणी घालून भात मोकळा शिजवून घ्यावा. 
  • भात गार करायला पसरून ठेवावा. 
  • भातात चमचाभर साखर, २ चमचे तूप खवा मोकळा करून, पावभाजी मसाला, नारळाचा कीस, टाकून भात हलक्या हाताने हलवून ठेवावा. 
  • कढईत तूप टाकून त्यात जिरं, तमालपत्र, हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकून फोडणी करावी. 
  • त्यावर खवा घातलेला भात मोकळा करून घालावा. 
  • बेदाण्यातील दूध काढून फक्त भिजलेले बेदाणे त्यावर घालावेत. 
  • हलक्या हाताने भात थोडा परतावा. 
  • वरून तळलेले काजू घालून सर्व्ह करावा. 
  • हा खवा व बेदाण्याचा भात रुचीपालट म्हणून खूप चांगला लागतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.