Halaman

    Social Items

गव्हले भात आणि हिवाळ्यातील हिरवाई रेसीपी मराठी | Gavale Bhat Recipe in Marathi | Gavle Rice

गव्हले भात आणि हिवाळ्यातील हिरवाई रेसीपी मराठी  | Gavale Bhat Recipe in Marathi | Gavle Rice





उन्हाळा आला की भाज्यांना चव नसते. किती जरी चांगले अन्न शिजवले तरी जेवण जात नाही. अशावेळी काहीतरी चवदार पदार्थ केले तर जेवण जाते व भाज्या साध्या केल्या तरी चालतात. शिवाय जास्त मसालेदार पदार्थ चवदार असूनही उन्हाळ्यात त्याचा त्रास होतो म्हणून जेवणाकरिता भाताचा साधाच पण आगळा वेगळा प्रकार केला तर भाजीपोळीला पुरवठा होतो व जेवणात चव येते.




साहित्य- 


  • चार वाट्या चांगले गव्हले, 
  • १ वाटी तूप, 
  • ओल्या नारळाचा कीस, 
  • ५-६ लवंगा, 
  • ५ वाट्या साखर, 
  • वेलची पूड, 
  • ५-६ बेदाणे, 
  • ५-६ बदाम, 
  • थोडे केशर
  • किंवा खाण्याचा रंग. 




कृती- 


  • जाड बुडाच्या पातेल्यात तुप टाकावे. 
  • तूप गरम झाल्यावर लवंगा टाकून गव्हले थोडेसे परतून घ्यावेत. 
  • गव्हल्याच्या दुप्पट पाणी घेऊन उकळी आल्यावर ते गव्हल्यावर टाकून गव्हले शिजवावेत. 
  • गव्हले फार मोकळे शिजवून घेऊ नये. 
  • कारण हा भात जरा मऊसरच चांगला लागतो. 
  • खोबरे व साखर शिजवून त्यात हा भात घालावा. 
  • वेलची पूड, काजू, बदाम, टाकावेत. 
  • बाकी कृती साखर भाताप्रमाणेच. 
  • हा भात फारच रुचकर लागतो व 
  • इतर भातापेक्षा वेगळा आहे. 
  • जेवताना चव येते.























कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.