Halaman

    Social Items

दोडके भात रेसीपी मराठी | कैरीचा भात | Dodake Bhat / Rice Recipe in Marathi | Kairi Bhat | Mango Rice

दोडके भात रेसीपी मराठी | कैरीचा भात | Dodake Bhat / Rice Recipe in Marathi | Kairi Bhat | Mango Rice  





साहित्य- 


  • २ वाट्या तांदूळ, 
  • अर्धा किलो कोवळे दोडके, 
  • २-३ हिरव्या मिरच्या, 
  • आल्याचा लहान तुकडा, 
  • १ चमचा धणेपुड, 
  • १ चमचा जिरेपुड, 
  • मीठ, 
  • १ वाटी ताक, 
  • थोडी हळद, 
  • कोथिंबीर, 
  • आले, 
  • खोबरे, 
  • फोडणीचे साहित्य, हिंग. 




कृती- 


  • प्रथम तांदूळ भाजून चार तास पाण्यात भिजत घालावेत. 
  • नंतर उपसून ठेवावेत. 
  • दोडके कडू गोड बघून घ्यावेत. 
  • कारण बरेच वेळा दोडके कडू असतात म्हणून थोडा तुकडा खाऊन पहावा. 
  • त्याच्या शिरा काढून ते किसून घ्यावेत.
  • एका पातेल्यात फोडणी करून त्यात हिंग, हिरव्या मिरचीचे तुकडे, आल्याचा कीस, दोडक्याचा कीस घालून चांगले परतावे. 
  • नंतर त्यात तांदूळ घालून परतावे व 
  • एक वाफ आल्यावर धणे, जिरेपुड मीठ टाकून मंद आचेवर भात शिजत ठेवावा. 
  • थोड्या वेळाने त्यावर थोडे ताक शिंपडावे व 
  • झाकण ठेवावे. 
  • भात झाल्यावर वाढायच्या वेळी कोथिंबीर व खोबऱ्याचा कीस घालून वाढावे. 
  • हा भात शिजवण्याकरिता वेगळे पाणी घालावे लागत नाही. 
  • दोडक्यातल्याच पाण्यावर व वाफेवरच शिजल्यामुळे त्याला एक वेगळाच रुचकरपणा येतो व भाताला रंगही चांगला येतो. 
  • भात झाल्यावर त्यात वरून थोडे तूप (साजूक) टाकून वाफ आणल्यास त्याला जास्त चव येते. 
  • हा भात जेवताना तुपाबरोबर 
  • चांगला लागतो. वेळेवर पापड भाजून वाढावे.




कैरीचा भात


कैरीचा भात हा भात दोडके भातासारखाच करावा पण दोडक्याच्या किसाऐवजी कच्चा कैऱ्यांचा कीस टाकावा व ताक टाकू नये.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.