Halaman

    Social Items

गोळ्याचा भात रेसीपी मराठीत | खमंग गोळा भात गोळा भात । विदर्भ स्पेशल गोळा भात| Gola Bhaat Recipe in Marathi | Nagpuri Gola bhat | gola bhat। Vidharbha special

गोळ्याचा भात रेसीपी मराठीत | खमंग गोळा भात गोळा भात । विदर्भ स्पेशल गोळा भात| Gola Bhaat Recipe in Marathi | Nagpuri Gola bhat | gola bhat। Vidharbha special





साहित्य- 


  • ४ वाट्या जुने तांदूळ, 
  • २ वाट्या चण्याच्या डाळीचे जाडसर पीठ, 
  • अर्धी वाटी दाण्याचा कूट, 
  • पाव वाटी कोरड्या खोबऱ्याचा कीस, 
  • २ चमचे धणेपुड, 
  • १ चमचा जिरेपुड, 
  • तिखट, 
  • मीठ, 
  • कोथिंबीर 



फोडणीचे साहित्य, 


  • लिंबू, 
  • साखर, 




कृती- 


  • थोडे जास्त तेल घालून फोडणी करावी. 
  • त्यात चण्याचे पीठ टाकून ते थोडे भाजावे. 
  • खाली उतरवून त्यात चवीनुसार तिखट, मीठ धणे जिरे पूड, दाण्याचा कूट, खोबऱ्याचा कीस घालून पाण्याने पीठ भिजवावे व 
  • त्या पिठाचे लहान गोळे करावेत. 
  • भात करण्यापूर्वी अर्धा तास तांदूळ धुवून ठेवावेत. 
  • नंतर थोड्या वेळावर तांदूळ परतून पाणी घालून भात शिजवावयास ठेवावा. 
  • भात शिजत असताना त्यात चवीला मीठ, थोडे तिखट, थोडी साखर व लिंबाचा रस घालावा. 
  • भात अर्धवट शिजल्यावर तयार केलेले गोळे त्यावर घालून हलक्या हाताने भात खालीवर करावा व 
  • झाकण ठेवून मंद आचेवर भात, पूर्ण शिजवावा. 
  • एका लहान कढईत तेलाची मोहरी, हिंग टाकून फोडणी करावी. 
  • भात वाढायच्या वेळी त्यावर कोथिंबीर टाकावी
  • व पानात भात वाढल्यावर वरील तयार केलेली हिंगाची फोडणी (गरम) त्यावर वाढावी. 
  • हा भात फारच चवदार लागतो. 
  • वडाभाताप्रमाणे तेल घेऊन चवदार लागतो. 
  • पूर्वी चुलीवरच्या स्वयंपाकात संध्याकाळी हा भात नेहमी करीत असत, 
  • कुकरमध्ये हा भात करता येत नाही. 
  • गॅसवर पातेल्यात सुटाच करावा लागतो. 
  • कारण गोळे अर्धवट शिजलेल्या भातावर टाकावे लागतात. 
  • भात असल्यावर पोळ्या कमी लागतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.