Halaman

    Social Items

मुरमुरे सांडगे रेसीपी मराठी | Murmure Sandage Recipe in Marathi

मुरमुरे सांडगे रेसीपी मराठी | Murmure Sandage Recipe in Marathi 




उन्हाळा सुरू झाला की, कडक उन्हात वाळवण्याकरिता वाळवणाचे प्रकार घरोघरी सुरू होतात, उन्हाळ्यानंतर प्रसंगी वेळेवर उपयोगात येणारे हे प्रकार चवदार लागतात. बघू या से प्रकार





साहित्य- 


  • अर्धा किलो चांगल्या प्रतीचे मुरमुरे, 
  • जिरे पावडर, 
  • धणे पावडर, 
  • हिंग,
  • चवीप्रमाणे मीठ, 
  • २ चमचे घरी केलेले लाल तिखट, 
  • कोथिंबीर





कृती- 


  • प्रथम मुरमुरे जास्त पाण्यात पोह्याप्रमाणे भिजवावे व 
  • चाळणीत निथळत ठेवावेत. 
  • पाणी निघाल्यानंतर मोठ्या परातीत काढुन वरील साहित्य मिसळून कणिक मळतो तसे चांगले मळावे. 
  • पाणी घालू नये, 
  • सर्व एकजीव झाल्यावर प्लास्टिक पेपरवर नेहमीप्रमाणे सांडगे घालावे. 
  • उन्हात चांगले कडक वाळवावेत. 
  • हे सांडगे तळल्यावर खुसखुशीत लागतात.
  • मधल्या वेळेत खाण्यास चांगले किंवा 
  • वेळेवर कुणी आले तर झटपट तळून देण्यास सोयीस्कर होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.