शाही मँगो नूडल्स रेसीपी मराठीत | Shahi Mango Noodle Recipe in Marathi | Sweet Noodles
उन्हाळा सुरू झाला की आंब्याच्या मोहोराचा सुगंध आसमंतात पसरतो.
हिरव्या कच्च कैऱ्या बघून तोंडाला पाणी सुटते. हळूहळू कैऱ्या पिकल्यानंतर आंब्यात झालेले रूपांतर तर . फारच विलोभनीय दिसते. बाजारात विविध प्रकारच्या पिवळ्या, केशरी आंब्यामळे फळांना शोभा येते. आंब्याला 'फळांचा राजा' म्हटले ते उगीचच नाही. आंब्याला अमृत फळही म्हणतात. अशा या सदाबहार, चवदार, मधुर आंब्याचे पदार्थ बघू या
साहित्य-
- १ वाटी शेवया,
- २ वाट्या हापूस किंवा चांगल्या चवदार आंब्याचा रस,
- १ वाटी साखर,
- वेलची पूड,
- १ वाटी सफरचंदाच्या बारीक फोडी,
- थोडी चारोळी,
- काजूचे तुकडे,
- बेदाणा,
- १/२ वाटी क्रीम किंवा साय,
- साजूक तूप,
- रंगीबेरंगी चेरी
कृती-
- गरम तुपात शेवया भाजून त्यात पाणी घालून शिजवाव्यात.
- आंब्याच्या रसात साखर घालून तोही शिजवावा.
- या शिजलेल्या गरम रसात वेलची पूड, काजू बेदाणा व थोडं तूप व सफरचंदाचे तुकडे घाला.
- शिजलेल्या शेवयात रसाचे वरील मिश्रण घाला व
- चांगलं मिसळून उकळ्या आल्यानंतर बाऊलमध्ये काढा.
- वरून क्रीम व रंगीबेरंगी चेरी टाकून सुशोभित करून सर्व्ह करा.
- या नूडल्स मुलांना फारच आवडतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.