आंबा पाणीपुरी रेसीपी मराठीत | कैरी पाणीपुरी | Mango /Aamba Panipuri Recipe in Marathi | Kairi Panipuri
साहित्य-
- उकडलेल्या कैरीचा गर १/२ वाटी,
- पाणीपुरीकरिता लागणाऱ्या पुरीचे पाकीट,
- पाणीपुरी मसाला,
- खारी बंदी,
- खजुराची आंबटगोड चटणी,
- मिरच्याची चटणी,
- किसलेला गूळ,
- उकडून किसलेला बटाटा १ वाटी
- मीठ,
- पुदीना पेस्ट,
- शेव
- डाळ कैरीची चटणी.
कृती-
- प्रथम मोठ्या गोड कैऱ्या उकडून त्यातील गर पाण्यात टाकून पातळ करा.
- त्यात आवश्यकतेनुसार गूळ, पाणीपुरीचा मसाला,
- चवीप्रमाणे मीठ व पुदिना पेस्ट घालून मिक्सरमधून काढून घ्या.
- त्यात सर्व करतेवेळी खारी बंदी घाला.
- परीला छिद्र करून त्यात बटाट्याचा कीस, शेव खजूर चटणी व चवीला मिरच्याची चटणी घाला.
- कैरीच्या आंबटगोड पाण्यात बुडवून खाण्यास द्या.
- सोबत डाळ कैरीची चटणी द्या.
- नेहमीच्या पाणीपुरीपेक्षा कैरीची पाणीपुरी नावीन्यपूर्ण वाटते व चवीला छान लागते.
- कैरीप्रमाणे पिकलेल्या आंब्याच्या रसाचीही पाणीपुरी वरीलप्रमाणे करता येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.