Halaman

    Social Items

शाही आंबटगोड चंपाकळी रेसीपी मराठीत | Shahi Aambatgod Champakali Recipe in Marathi | Royal Sour sweet Champakali Recipe

शाही आंबटगोड चंपाकळी रेसीपी मराठीत | Shahi Aambatgod Champakali Recipe in Marathi | Royal Sour sweet Champakali Recipe



साहित्य-


  • १/२ वाटी कैरीचा कीस,
  • २ गोड हापूस आंब्याच्या चिरलेल्या फोडी.
  • १/२ वाटी खवा,
  • २ चमचे साजूक तूप,
  • १ वाटी पिठीसाखर,
  • १/२वाटी काजूची जाडसर पावडर,
  • सजावटीसाठी काजू,
  • बदाम,
  • पिस्त्याचे बारीक तुकडे वरून लावायला चांदी वर्ख.





कृती-


  • प्रथम एका जाड बुडाच्या पातेल्यात कैरीचा कीस व आंब्याच्या फोडी एकत्र करून मंद गॅसवर हळूहळू घोटत राहावे.
  • एकजीव झाले की त्यात खवा टाकून पुन: घोटावे.
  • नंतर काजूचा जाडसर चुरा टाकावा.
  • साखर टाकावी.
  • नंतर सर्व मिश्रण सारखे करून हळूहळू घट्ट होईस्तोवर घोटत
  • राहावे.
  • बुडाला लागू नये म्हणून सारखे हलवावे.
  • मिश्रण जरा घट्ट होत आले की पातेले खाली उतरून घ्यावे.
  • नंतर थोडे थंड झाल्यावर एका प्लास्टिकच्या कागदाला तूप लावून त्यावर हे मिश्रण थापावे.
  • वरून काजू बदाम पिस्त्याचे तुकडे लावावेत.
  • अगदी थोडा चांदीचा वर्ख लावावा व
  • पुन: लाटण्याने सारखे करावे.
  • नंतर साचाने वेगळे वेगळे आकार द्यावे.
  • आंबटगोड चंपकळी बरेच दिवस टिकते,
  • सर्वांना आवडते.
  • उपासालाही चालते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.