Halaman

    Social Items

आंबा रसाच्या साटोऱ्या रेसीपी मराठी | आंब्याची खुसखुशीत रव्याची सांजोरी|साटोरी रेसिपी| आंब्याची साटोरी | Mango satori Recipe in Marathi | Mango satori|sanjori recipe|Paramparik padarth sator

 आंबा रसाच्या साटोऱ्या रेसीपी मराठी | आंब्याची खुसखुशीत रव्याची सांजोरी|साटोरी रेसिपी| आंब्याची साटोरी | Mango satori Recipe in Marathi | Mango satori|sanjori recipe|Paramparik padarth sator




साहित्य - 


  • पारीसाठी २०० ग्रॅम मैदा, 
  • ५० ग्रॅम रवा, 
  • ४ टे. स्पू. तूप, 
  • मीठ, 
  • १ वाटी दूध. 




सारणासाठी - 


  • १ वाटी आटवलेला आंब्याचा रस, 
  • १ वाटी मावा, 
  • अर्धी वाटी खोवलेलं नारळ, 
  • २ टे. स्पू, रवा, 
  • १ वाटी किसलेला गूळ, 
  • तळणीसाठी तूप. 





कृती - 


  • मैदा आणि रवा चाळून घ्यावा. 
  • त्यात मीठ, तूप घालून मैदा आणि रवा दुधात घट्ट भिजवून ठेवावा. 
  • भिजवलेला गोळा ओल्या कपड्यानं झाकून ठेवावा. 
  • कढईत थोडं तूप टाकून रवा गुलाबी रंगावर परतून घ्यावा. 
  • खवा (मावा) परतून घ्यावा. 
  • खवा, आंब्याचा रस, खावलेलं नारळ आणि गूळ एकत्र करावा. 
  • हे मिश्रण चांगलं मळून एकजीव करावं. 
  • भिजलेलं पीठ कुटून मऊ करावं. 
  • पिठाची लिंबाएवढी गोळी करून त्याला वाटीचा आकार द्यावा. 
  • त्यात आंब्याचं मिश्रण भरून वाटीचं तोंड बंद करावं. 
  • हलक्या हातानं साटोरी लाटावी. 
  • तुपात मंद आचेवर साटोऱ्या गुलाबी रंगावर तळून घ्याव्या. 
  • या वेगळ्या चवीच्या साटोऱ्या सर्वांना नक्कीच आवडतील!









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.