आंब्याचा गोड भात रेसीपी मराठी |
आंबा भात | Sweet Mango Rice Recipe in Marathi | Rice Recipe | Mango Recipe
साहित्य -
- दोन वाट्या जुना बासमती तांदूळ,
- १ वाटी साखर,
- दोन वाटी आंब्याचा रस,
- १ वाटी खोवलेला नारळ,
- अर्धी वाटी साजूक तूप,
- दोन-तीन लवंगा,
- वेलची,
- बदाम,
- काजू,
- बेदाणे आणि
- आवडीनुसार केशर काड्या.
कृती -
- तांदूळ निवडून स्वच्छ धुवून तासभर निथळत ठेवावे.
- जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून त्यात लवंग आणि वेलची घालावी.
- नंतर तुपात तांदूळ टाकून परतून घ्यावे.
- तांदळाच्या दुप्पट पाणी गरम करून त्यात घालावं.
- भात मोकळा शिजवून घ्यावा.
- शिजवलेला भात परातीत पसरून मोकळा करावा.
- दुसऱ्या पातेल्यात खोवलेला नारळ, आंब्याचा रस आणि साखर घालून मिश्रण एकजीव होईपर्यंत शिजवावं.
- नंतर त्यात केशर काड्या, शिजलेला भात, काजू-बदाम, बेदाणे घालून ते चागल एकत्र करावं.
- भात हालवताना थोडे तूप कडेनं सोडावं.
- भांड्यावर झाकण ठेवून भात दणदणीत वाफ आणून वाफवून घ्यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.