आंबा वडी रेसीपी मराठी | आंबा बर्फी | Amba Barfi Recipe in Marathi | Amba Vadi Recipe | Amba vadi without mava | Mango barfi | How to make Mango barfi at home | aam ki wadi | Mango Dessert | Sweet recipe
साहित्य -
- २५० ग्रॅम बारीक रवा,
- २५० ग्रॅम तूप,
- १ वाटी आमरस,
- १०० ग्रम दूध पावडर,
- साखर,
- गरजेनुसार दूध,
- अर्धा टी. स्पू. मंगो इसेन्स.
कृती-
- दोन टे.स्पू. तुपात मंद आचेवर रवा भाजून घ्यावा.
- साखरेत थोडं पाणी घालून पाक करायला ठेवावा.
- पाक करताना मिश्रण सारखं ढवळावं
- एकतारी पाक झाल्यावर त्यात आमरस घालून पाक हालवत राहावं
- पाकाला चांगली उकळी आल्यावर गॅस बंद करावा.
- त्यात रवा, मिल्क पावडर आणि इसेन्स टाकून ते चांगलं मिसळून घ्यावं.
- मिश्रण सतत हालवत राहावं.
- घट्ट झाल्यावर ते मिश्रण तूप लावलेल्या ताटात ओतुन एकसारखं पसरावं,
- मिश्रण वाटीनं सारखं करावं.
- घट्ट झाल्यावर एकसारख्या वड्या पाडाव्यात.
- मिश्रण जास्त घट्ट वाटल्यास ताटात पसरायच्या आधी त्यात थोडं दुध मिक्स करावं
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.