आमरस मलाई रेसीपी मराठीत | आंबा मलाई | Aamras Malai Recipe in Marathi | Aamba Malai | Mango Cream
साहित्य-
- आंब्याचा १ वाटी रस,
- आटवलेले दूध (थंड करून) २ वाटी
- ४ ते ५ चमचे साखर (आवडीनुसार)
- विलायची पूड अर्धा च.
- कलमी आंब्याचे स्कूपरने कोरलेले गोल काप,
- मलई १ चमचा.
कृती-
- आंब्याचा रस, दूध व साखर एकत्र मिसळून घ्या.
- विलायची पुड घाला व आंब्याचे गोलाकार काप घाला.
- फ्रिजमध्ये थंड करायला ठेवा.
- थंड झाल्यावर देताना वरून मलई घाला.
- बदाम पिस्त्याचे काप घाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.