दह्यातील मिक्स भाजी रेसीपी मराठीत | Mix Bhaji in Yogurt / Dahi Recipe in Marathi
साहित्य-
- फुलकोबी व सिमला मिरची चिरलेली अर्धी वाटी,
- वाटाणा अर्धी वाटी,
- गाजर किस पाव वाटी,
- दीड वाटी फेटलेले दही,
- आले मिरची पेस्ट एक चमचा,
- मीठ चवीनुसार,
- तूप,
- जिरे,
- हिंग,
- मोहरी,
- लाल मिरच्या दोन,
- शेंगदाणे कूट दोन चमचे,
- दोन लवंग,
- कोथिंबीर.
कृती -
- भाज्या थोड्या वाफवून घ्या. (गाजर किस सोडून)
- दह्यात मीठ, मिरची आले पेस्ट, दाणेकुट घाला.
- तुपाची खमंग फोडणी करून दह्यावर घाला
- आणि वाफवलेल्या भाज्या मिक्स करा.
- चवीने आंबटसर आणि नेहमीपेक्षा भिन्न चवीची रुचकर भाजी तयार होईल.
- कोथिंबीर व गाजरकिसाने सजावट करा.
- पौष्टिक दह्यातील भाजी तयार होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.